भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण पुन्हा एकदा नेटिझन्सकडून ट्रोल झाला. आपलं मत स्पष्टपणे मांडणाऱ्या इरफानवर एका नेटकऱ्यानं गंभीर आरोप केले आणि त्याला माजी क्रिकेटपटूनं सडेतोड उत्तर दिलं. इरफानला दुसरा हाफिज सईद बनायचे आहे, असे एका नेटकऱ्यानं ट्विट केलं. त्यावर इरफान चांगलाच खवळला अन् त्यानं त्या नेटकऱ्याच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत नाराजी व्यक्त केली. त्यावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढानं प्रतिक्रिया दिली.
इरफान पठाणनं नुकत्याच एका मुलाखतीत ग्रेग चॅपल यांच्याबद्दल मोठं विधान केलं होतं. इरफानची क्रिकेट कारकीर्द टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक चॅपल यांच्यामुळे संपुष्टात आली, असा अनेकांचा दावा होता. पण, इरफानचं मत काही वेगळेच होते. त्यानं चॅपल यांना दोष देणं चुकीचं असल्याचे म्हटले. इरफानचं हे म्हणणं एका चॅनलनं ट्विटवर पोस्ट केलं आणि त्यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली. त्यात तिनं लिहिलं की,''दुसरा हाफिज सईद बनण्याच्या महत्वकांक्षेला इरफान पठाण लपवू शकत नाही.''
या कमेंटवर इरफान पठाण खवळला. त्यानं लिहिलं की,''ही काही लोकांची मानसिकता आहे. आपण कुठे पोहोचलो आहोत? लाजीरवाणी आणि घृणास्पद.''
सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!
Fact check: चीनला विरोध करणाऱ्या हाँगकाँगच्या आंदोलकांमध्ये खरंच दिसले का किम जोंग-उन?
ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट