Irfan & Yusuf Pathan : कोरोना संकटात अन्नदाता बनलेले पठाण बंधू आता ऑक्सिजन संचही देतायेत मोफत

Irfan and Yusuf Pathan इरफाननं सोशल मीडियावरून चॅरिटीसाठी गोळा केलेली संपूर्ण रक्कम कोरोना लढ्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 01:54 PM2021-05-28T13:54:10+5:302021-05-28T13:54:52+5:30

whatsapp join usJoin us
Irfan and Yusuf Pathan are providing oxygen concentrator on returnable basis, free of cost | Irfan & Yusuf Pathan : कोरोना संकटात अन्नदाता बनलेले पठाण बंधू आता ऑक्सिजन संचही देतायेत मोफत

Irfan & Yusuf Pathan : कोरोना संकटात अन्नदाता बनलेले पठाण बंधू आता ऑक्सिजन संचही देतायेत मोफत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

खरा माणून संकटात कळतो... कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा हातावर पोट असलेल्यांना हतबल केले आहे. त्यात  इरफान व युसूफ हे पठाण बंधू  यांनी परत एकदा मदतीसाठी हात पुढे केला आहे. दक्षिण दिल्ली आणि वडोदरा येथील कोरोनाबाधित कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याचं काम ते करत आहेत. मागच्या वर्षी या बंधूंनी जवळपास ९० हजार कुटुंबीयांच्या घरी रेशन पूरवण्याचं काम केलं आणि हे सर्व त्यांनी स्वखर्चातून करून दाखवले. क्रिकेटच्या मैदानावरील भावांची ही हिट जोडी मैदानाबाहेर सुपरहिट ठरली आहे. आता तर त्यांनी वडोदरा येथे ज्यांना ऑक्सिजन संच हवा आहे त्यांनाही तो मोफत देत आहेत..  भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!


गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी पठाण बंधूंनी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सनानं PPE किट्स व मास्कचे वाटपही केलं होतं. आता कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत असताना या दोघांनी वडिलांच्या नावानं सुरू असलेल्या Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरवण्याचे काम सुरू केले आहे. क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स ( Cricket Academy of Pathans ) च्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देत आहेत. Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा ते आता मोफत ऑक्सिजन संचही देणार आहेत.

इरफाननं सोशल मीडियावरून चॅरिटीसाठी गोळा केलेली संपूर्ण रक्कम कोरोना लढ्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: Irfan and Yusuf Pathan are providing oxygen concentrator on returnable basis, free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.