Join us

Video: पत्रकार परिषदेत वाजला फोन, कॉल उचलून LSG कोच म्हणाला- "रात्रीचे १२ वाजलेत..."

LSG coach Justin Langer, IPL 2025 Video: काय घडला मजेशीर किस्सा... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:37 IST

Open in App

LSG coach Justin Langer, IPL 2025 Video: लखनौच्या एकाना स्टेडिमयवरील सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians ) १२ धावांनी पराभूत केले. लखनौने प्रथम फलंदाजी करताना २००पार मजल मारली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने २० षटकात केवळ १९१ धावाच केल्या. अखेर लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभूत केले. सूर्यकुमार यादवने फटकेबाजी करत ६७ धावा केल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. पुढे तिलक वर्मालाही रिटायर्ड आऊट करण्यात आले. २० षटकांनंतर मुंबईला केवळ १९१ धावाच करता आल्या. हा सामना जिंकून लखनौने दमदार कामगिरी केली. सामना आणि त्यानंतरचे प्रेझेंटेशन संपण्यासाठी बराच वेळ गेला. त्यामुळे कोच व खेळाडूंच्या प्रेस कॉन्फरन्सला १२ वाजून गेले. याचदरम्यान एक मजेशीर किस्सा घडला.

LSG कोच जस्टिन लँगर विजयानंतर खूप आनंदी होता. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत लँगर खूप चांगल्या मूडमध्ये होता. रेकॉर्डिंगसाठी बऱ्याच पत्रकारांनी आपले फोन टेबलावर ठेवले होते. त्यात एका पत्रकाराचा फोन आला. त्या पत्रकाराच्या आईचा फोन होता. लँगरने फोन दाखवला आणि फोन उचलून म्हणाला- "आई, रात्रीचे १२ वाजलेत, मी पत्रकार परिषदेत आहे." पत्रकाराच्या आईशी बोलल्यानंतर, लँगरने हसतहसत फोन ठेवून दिला.

मयंक यादवच्या फिटनेसबाबत दिली अपडेट

लखनौचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगरने मयंक यादवबद्दल सांगितले की, येत्या काही दिवसांत जर सर्व काही व्यवस्थित झाले तर तो लवकरच संघात सामील होऊ शकतो. सध्या तो बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या क्षमतेच्या ९० ते ९५ टक्के गोलंदाजी करण्यास सक्षम आहे आणि येत्या काही दिवसांत तो संघात परतू शकतो. काल मी एनसीएमधील त्याचे व्हिडीओ पाहिले. मयंक सध्या पूर्णपणे फिट आहे. आयपीएल आणि टीम इंडियासाठी ही चांगली गोष्ट आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्सव्हायरल व्हिडिओ