Join us

आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   

IPL News: यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या तिकीट घोटाळ्यामध्ये कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ए. जगनमोहन राव यांना बुधवारी सीआयडीने अटक केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:10 IST

Open in App

यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या तिकीट घोटाळ्यामध्ये कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ए. जगनमोहन राव यांना बुधवारी सीआयडीने अटक केली. जगनमोहन राव यांच्यासह कोषाध्यक्ष सी श्रीनिवास राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कांते, सरचिटणीस राजेंद्र यागव आणि त्यांची पत्नी जी. कविता या हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सीआयडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आयपीएल सामन्यांच्या मोफत तिकिटांच्या वितरणामध्ये झालेला घोटाळा, आर्थिक अनियमितता आणि दबाव आणल्याच्या आरोपाखाली ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

तेलंगाणा क्रिकेट संघटनेचे सरचिटणीस धरम गुराव रेड्डी यांच्यावतीने या संदर्भात ९ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधारावर सीआयडीने विविध कलमांखाली  गुन्हा नोंदवला होता. याशिवाय जगनमोहन राव यांनी हैदराबाद क्रिकेट संघटनेची निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली होती, असाही आरोप करण्यात आला आहे.

याबरोबरच हैदराबाद क्रिकेट संघटनेने आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या फ्रँचायझीवर निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक कॉम्प्लिमेंट्री तिकीट देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे.  सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद क्रिकेट संघटना आणि बीसीसीआय यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार हैदराबाद क्रिकेट संघटनेला ३ हजार ९०० कॉम्प्लिमेंट्री तिकिटं मिळणं अपेक्षित आहे. ही तिकिटांची संख्या स्टेडियममधील एकूण प्रेक्षक संख्येच्या १० टक्के एवढी आहे. मात्र हैदराबाद क्रिकेच संघटनेच्या अधिकाऱ्यांनी या मर्यादेपेक्षा अधिक तिकिटांची मागणी केली. मात्र सनरायझर्स हैदराबादने ही मागणी फेटाळून लावली होती. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादतेलंगणागुन्हेगारी