IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त

Security Arrangements,  IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB: आयपीएल सामन्यांसाठी स्टेडियमला आलं छावणीचं स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:53 IST2025-05-29T11:52:04+5:302025-05-29T11:53:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ipl qualifier 1 pbks vs rcb security high alert mullanpur new chandigarh security arrangements punjab police playoffs | IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त

IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त

Security Arrangements,  IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB: आयपीएलचे साखळी फेरीचे सामने संपले. आजपासून प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. आज नवीन चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये क्वालिफायर-१ सामना होणार आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) यांच्यात सामना रंगणार आहे. या क्रिकेट स्टेडियममध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे चाहत्यांची प्रचंड गर्दी आणि VIP मंडळींचीही हजेरी असणार आहे. हे लक्षात घेता, प्रशासन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क झाले आहे.

चोख सुरक्षाव्यवस्था, सर्वांवर बारकाईने लक्ष

पंजाबपोलिसांनी या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी चोख सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे आणि सामना सुरळीतपणे पार पडावा यासाठी संपूर्ण परिसरात हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे. स्टेडियमच्या आत आणि बाहेर सुरक्षा दलांची तैनात वाढवण्यात आली आहे आणि प्रत्येक उपस्थितावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पंजाबचे विशेष डीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) अर्पित शुक्ला यांनी सामन्याच्या सुरक्षेबद्दल सांगितले की, मुल्लानपूर स्टेडियममध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे सामने होणार आहेत. ते सामने पाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. लोकांमध्ये खूप उत्साह आहे. आम्ही स्टेडियममध्ये आणि आजूबाजूला चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

२५०० जवान, ६५ गॅजेटेड ऑफिसर, मॉक ड्रिल...

ते पुढे म्हणाले, सुरक्षा व्यवस्थेचा आज आढावा घेतला जात आहे. आमच्या पोलिस दलात सुमारे ६५ गॅजेटेड अधिकारी आणि २५०० हून अधिक जवान तैनात आहेत. आम्ही पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याची खात्री करू. तसेच सुरक्षा उपाययोजना देखील खूप कडक असतील. आम्ही या सामन्यासाठी मॉक ड्रिल देखील केली आहे, असेही पंजाबचे विशेष डीजीपी यांनी सांगितले.

न्यू चंदीगडमध्ये प्लेऑफचे दोन सामने

भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक बदलण्यात आले. आता, सुधारित वेळापत्रकानुसार, मुल्लानपूर येथे क्वालिफायर १ गुरुवारी आणि एलिमिनेटर (गुजरात आणि मुंबई दरम्यान) शुक्रवारी होईल, तर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना १ आणि ३ जून रोजी अहमदाबाद येथे होईल.

Web Title: ipl qualifier 1 pbks vs rcb security high alert mullanpur new chandigarh security arrangements punjab police playoffs