Join us

IPL Points Table: चेन्नई सुपरकिंग्जची थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप; पाहा आयपीएलचे लेटेस्ट Points Table

IPL Points Table: राजस्थान रॉयल्स ५ सामन्यात ४ विजय मिळवत गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानी कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:37 IST

Open in App

तब्बल ४४४ धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने ८ धावांनी बाजी मारताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) त्यांच्याच एम. चिन्नास्वामी मैदानावर नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नईने २० षटकांत ६ बाद २२६ धावा उभारल्या. यानंतर आरसीबीला २० षटकांत ८ बाद २१८ धावांवर रोखत चेन्नईने एकूण ६ गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले.

MS Dhoni मैदानावर येताच अनुष्का शर्मा 'काहीतरी' म्हणाली! तुफान व्हायरल होतोय Video

राजस्थान रॉयल्स ५ सामन्यात ४ विजय मिळवत गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. तर लखनऊ सुपर जायट्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर असून पंजाब किंग्स पाचव्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या स्थानी असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सातव्या क्रमांकावर आहे. ४ सामन्यात २ सामने जिंकत मुंबई इंडियन्स आठव्या स्थानी असून सनराजर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने ५ पैकी एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळे गुणतालिकेत दिल्लीचा संघ शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. 

आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

दोन्ही संघ सुरुवातीला दोन सामन्यांत पराभूत झाले.  त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांत दोघांनीही सरशी साधली. त्या संघांचे नाव मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद! मंगळवारी आता दोघे एकमेकांपुढे उभे ठाकतील तेव्हा सरशी कुणाची होईल, हे उद्याच समजेल. एक खरे की जो संघ बाजी मारेल, तो विजयी हॅट्ट्रिक साधणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App