IPL Playoff Scenario: धोनीच्या हातात मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचे तिकीट, पुन्हा समीकरण बदललं!

Mumbai Indians IPL Playoff Scenario: चेन्नई- कोलकाता यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार की नाही? हे स्पष्ट होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:45 IST2025-05-07T14:43:40+5:302025-05-07T14:45:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL playoffs scenarios for Mumbai Indians after last-ball loss to Gujarat Titans | IPL Playoff Scenario: धोनीच्या हातात मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचे तिकीट, पुन्हा समीकरण बदललं!

IPL Playoff Scenario: धोनीच्या हातात मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचे तिकीट, पुन्हा समीकरण बदललं!

गुजरातविरुद्ध पराभवानंतर मुंबईचा संघ अडचणीत सापडला. गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या मुंबईचा संघ आता चौथ्या स्थानावर घसरला. आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा ५७ वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार की नाही? हे स्पष्ट होईल. चेन्नईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्यामुळे त्यांच्यासाठी या स्पर्धेत काहीही गमावण्यासारखे नाही. परंतु, चेन्नईचा कोलकाताविरुद्ध पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सचे मोठे नुकसान होणार आहे. 

चेन्नई, राजस्थान आणि हैदराबादचा संघ स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडले. दुसरीकडे आतापर्यंत कोणत्याही संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले नाही. सध्याची परिस्थिती पाहता गुजरात आणि आरसीबी यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित दिसते. पंजाबचा संघही तिसऱ्या स्थानावर सुरक्षित दिसत आहे. परंतु, चौथ्या स्थानासाठी पंजाब, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धचा सामना कोलकात्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोलकात्याचा संघ कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. 

कोलकात्याने आतापर्यंत ११ सामने खेळले असून पाच सामने जिंकले असून त्यांचे ११ (+ ०.२४९) गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. कोलकात्याला त्यांचे पुढील सामने चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूविरुद्ध खेळायचे आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना १७ गुणांची आवश्यकता आहे.

धोनीच्या हातात मुंबईच्या प्लेऑफचे तिकीट
आजच्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाल्यास गुणतालिकेत मोठी उलथापालथ होईल. चेन्नईचा कोलकात्याविरुद्धचा विजय मुंबईसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे आता थाला मुंबईला प्लेऑफचे मिळवून देईल का? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.

Web Title: IPL playoffs scenarios for Mumbai Indians after last-ball loss to Gujarat Titans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.