Gujarat Titans vs Mumbai Indians IPL Eliminator: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससाठी आजचा दिवस करा किंवा मरा असा आहे. या दोन्ही संघात आज IPL 2025 चा पहिला एलिमिनेटर सामना होत आहे. विजेता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जाईल, तर पराभूत संघ आयपीएलमधून बाहेर पडेल. दरम्यान, या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. गुजरातशी सामना होण्यापूर्वी मुंबईने पाच विकेट गमावल्या आहेत.
मुंबईचे पाच खेळाडू एलिमिनेटरला मुकणार
मुंबई इंडियन्सच्या विजयात मोठे योगदान देणारे पाच खेळाडू एलिमिनेटर सामन्यात खेळताना दिसणार नाहीत. रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स हे तिघे मुंबई इंडियन्स सोडून त्यांच्या देशात परतले आहेत. विल जॅक्स वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, तर रिक्ल्टन आणि बॉश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीची तयारी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला परतले आहेत.
चहर आणि तिलक दुखापतग्रस्त?
परदेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूदेखील आजच्या सामन्याला मुकणार आहेत. तिलक वर्मा आणि दीपक चाहर दुखापतींशी झुंजत आहेत. दोन्ही खेळाडू चंदीगड विमानतळावर अडखळताना दिसले. त्यामुळे आजच्या सामन्यात हे दोघेही खेळणार की नाही, याबाबत संशय कायम आहे.
मुंबईच्या संघात कोण खेळेल?
मुंबई इंडियन्सच्या संघातून पाच मोठे खेळाडू बाहेर पडले, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार कोण? जॉनी बेअरस्टो एलिमिनेटर सामन्यात खेळण्याची खात्री आहे. याशिवाय, विल जॅक्सच्या जागी चरित अस्लंकालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. मुंबईचा गुजरातविरुद्धचा रेकॉर्ड खूपच वाईट असल्याने या सामन्यात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मुंबईने गुजरातविरुद्ध फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर पाच सामने गमावले आहेत. गेल्या चार सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईने फक्त गुजरातविरुद्धच पराभव पत्करला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना मुंबईसाठी खूप कठीण ठरणार आहे.
Web Title: IPL MI vs GT: Gujarat Titans hit the jackpot; Half of Mumbai Indians team 'out' before the eliminator match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.