नवी दिल्ली : एकूण दहा संघांचा समावेश असलेल्या यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात २७ मार्चपासून होण्याची शक्यता आहे. तसेच २८ मे ला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाऊ शकतो.
हाती आलेल्या काही अहवालांनुसार मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार शहरांत संपूर्ण आयपीएलचे सामने खेळविले जातील. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील एकूण सहा मैदानांवर आयपीएलच्या साखळी फेरीतील सामने पार पडतील, तर प्लेऑफसह अंतिम सामना अहमदाबादच्या स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईतील सामने वानखेडे, ब्रेबॉर्न, डॉ. डी. वाय. पाटील आणि रिलायन्स जियो या स्टेडियमवर खेळविले जाऊ शकतात