Join us

IPL आजचा सामना - केकेआरची पंजाबविरुद्ध जोखमेची रणनीती

पंजाबने विजयी सुरुवात केली पण गोलंदाजांनी २०० धावा मोजल्याने गोलंदाजांकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 05:42 IST

Open in App

मुंबई : केकेआर संघ शुक्रवारी आयपीएल-१५ मध्ये किंग्स पंजाबविरुद्ध मैदानात उतरेल. त्यावेळी जोखीम पत्करण्याची त्यांची रणनीती कायम राहणार आहे. मागच्या सामन्यात केकेआरला आरसीबीकडून तीन गड्यांनी पराभव पत्करावा लागला. 

n पंजाबने विजयी सुरुवात केली पण गोलंदाजांनी २०० धावा मोजल्याने गोलंदाजांकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा आहे. वेगवान कॅगिसो रबाडा क्वांरटाईन पूर्ण करून बाहेर   पडल्यानंतर तो उद्या खेळण्याची शक्यता आहे.n फलंदाजीची भिस्त कर्णधार मयांक अग्रवाल, शिखर धवन आणि श्रीलंकेचा भानुका राजपक्षे यांच्यावर असेल. राजपक्षेने   आरसीबीविरुद्ध ‘मॅच विनिंग’ खेळी केली होती.n १९ वर्षांखालील विश्वचषक विजयाचा स्टार राज बावा याला पदार्पणाची संधी मिळेल का, हे पहावे लागेल. गोलंदाजीची जबाबदारी संदीप शर्मा,         अर्शदीपसिंग आणि ओडियन स्मिथ, राहुल चाहर आणि हरप्रीत ब्रार यांच्याकडे असेल.n केकेआरचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि आक्रमक व्यंकटेश अय्यर आरसीबीविरुद्ध लवकर बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यरदेखील फारसा प्रभावी ठरला नव्हता. मात्र तो फॉर्ममध्ये आहे. नितीश राणाकडून सहकार्याची कर्णधाराला अपेक्षा असेल.n मधल्या फळीची जबाबदारी सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन आणि ‘बिग हिटर’ आंद्रे रसेल यांच्या खांद्यावर राहील. पंजाबविरुद्ध केकेआरच्या फलंदाजांनी एकसंध कामगिरी केल्यास मोठ्या धावा निघू शकतील.

n वानखेडेच्या खेळपट्टीवर आतापर्यंत दोनच सामने झाले. येथे फलंदाजी करणे सोपे नाही, हे स्पष्ट झाले आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालणाऱ्या लीगची ही तर केवळ सुरुवात असली तरी नाणेफेकीचा कौल       आतापासूनच निर्णायक जाणवू लागला. सामन्याच्या दुसऱ्या डावात दवबिंदू महत्त्वाची भूमिका बजावतात.

टॅग्स :आयपीएल २०२२किंग्स इलेव्हन पंजाबमुंबई
Open in App