Join us

IPL 2024 RCB vs PBKS: RCB ने टॉस जिंकला! WPL जिंकली त्याचं प्रेशर आहे का? डुप्लेसिस म्हणाला...

IPL 2024 RCB vs PBKS Live Score Card: आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 19:28 IST

Open in App

IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi | बंगळुरू: आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिखर धवनचा पंजाब किंग्जचा संघ प्रथम फलंदाजी करेल. (IPL 2024 Live) पंजाबच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजयी सलामी दिली. तर आरसीबीला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. 

अलीकडेच पार पडलेल्या महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL 2024) आरसीबीच्या महिला संघाने विजय मिळवला. याबद्दल नाणेफेकीवेळी कर्णधार फाफ डुप्लेसिला प्रश्न विचारला असता त्याने भारी उत्तर दिले. आरसीबीच्या महिला संघाने WPL जिंकली याचा दबाव आहे का? यावर फाफ म्हणाला की, आमच्या महिला संघाने जेतेपद जिंकले याचा आनंद आहे. आम्ही एकदाही ट्रॉफी जिंकली नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही देखील जेतेपद जिंकू... यासाठी प्रयत्न सुरू आहे. 

पंजाब किंग्जचा संघ -शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

बंगळुरूचा संघ -फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज. 

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमहिला प्रीमिअर लीगपंजाब किंग्सशिखर धवन