Join us  

IPL 2024 CSK vs RCB: RCB सुस्साट पण अचानक आला 'स्पीड ब्रेकर', कर्णधारानंतर दोघांचे लोंटागण

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: आजपासून आयपीएलला सुरुवात झाली असून CSK आणि RCB याच्यांत सलामीचा सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 8:37 PM

Open in App

CSK vs RCB Match Live Updates | चेन्नई: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. (CSK vs RCB Live) गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होत आहे. सीएसकेचा संघ आपल्या घरात अर्थात चेन्नईत आरसीबीविरूद्ध मैदानात आहे. नवनिर्वाचित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचे शिलेदार मैदानात आहेत.  आरसीबीने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना फाफ डुप्लेसिसने शानदार फलंदाजी केल्यानंतर आरसीबीच्या सुस्साट गाडीला अचानक ब्रेक लागला. 

सुरुवातीपासून आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने स्फोटक खेळी केली. त्याने २३ चेंडूत ३५ धावा कुटल्या. घातक वाटणाऱ्या फाफला बाद करण्यात मुस्तफिजुर रहमानला यश आले. डावाच्या ४१ धावांवर आरसीबीने आपला पहिला गडी गमावला. रहमानने डुप्लेसिसला बाद करताच त्याच षटकात रजत पाटीदारला बाहेरचा रस्ता दाखवला. पाटीदारला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर पुढच्या षटकात दीपक चाहरने ग्लेन मॅक्सवेलला (०) बाद करून आरसीबीला तिसरा झटका दिला. 

आजच्या सामन्यासाठी CSK चा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.

आजच्या सामन्यासाठी RCB चा संघ - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.

टॅग्स :आयपीएल २०२४दीपक चहरग्लेन मॅक्सवेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्स