Join us

IPL मध्ये केली बक्कळ कमाई; 'नॅशनल ड्युटी' बजावण्याची वेळ आल्यावर म्हणाला, मला विश्रांती हवी!

जो IPL फायनल खेळला तो संघात दिसतोय, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:01 IST

Open in App

आयपीएलच्या १८ व्या हंगामानंतर आता वेगवेगळ्या १०  फ्रँचायझी संघातील खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी मोकळे झाले आहेत. यंदाच्या हंगामात काही परदेशी खेळाडूंनी राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी प्लेऑफ्सच्या लढतीआधी मायेदेशी परतण्याला पसंती दिली. पण प्लेऑफ्सआधीच ज्या संघाचा प्लेऑफ्समधील प्रवास संपुष्टात आला त्या संघातील गडी राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास तयार झालेला नाही. एक नजर टाकुयात कोण आहे तो खेळाडू? अन् आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्या मालिकेतून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतलाय? त्यासंदर्भातील स्टोरी 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IPL मध्ये केली तगडी कमाई, देशाकडून खेळण्याची वेळ आल्यावर हवी विश्रांती

आयपीएलच्या १८ व्या हंगामात धमाकेदार सुरुवात करणाऱ्या या खेळाडूचं नाव आहे निकोलस पूरन. लखनौच्या ताफ्यातून त्याने दमदार कामगिरी केली. पण संघाला प्लेऑफ्समध्ये नेण्यात त्याची कामगिरी उपयुक्त ठरली नाही. २१ कोटी रुपयांसह लखनौ फ्रँचायझीने ज्याला मालामाल केलं त्या खेळाडूनं वेस्ट इंडिज संघाकडून खेळण्यास नकार दिला आहे. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड विरुद्ध ३ सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी तो संघाचा भाग नाही. त्याने स्वत: विश्रांती मागितल्यामुळे त्याचा संघात समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे.  

IPL 2025 : यंदाच्या हंगामातील सिक्सर किंग कोण? इथं पाहा टॉप ५ मध्ये असलेल्या बॅटर्सचा रेकॉर्ड

जो IPL फायनल खेळला तो संघात दिसतोय, पण...

निकोलस पूरन याचा संघात समावेश नसला तरी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अन्य खेळाडूंपैकी आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रुदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड यांना मात्र वेस्ट इंडिजच्या संघात स्थान मिळाल्याचे दिसते.रोमारियो शेफर्ड तर RCB कडून फायनलही खेळला होता. त्यामुळे निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेतून माघार घेणं म्हणजे आयपीएलमधील बक्कळ कमाईच तो समाधानी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका  ६ जून पासून सुरु होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना ८ जून तर अखेरचा सामना १० जूनला खेळवण्यात येणार आहे. हे सामने चेस्टर ले स्ट्रीट, ब्रिस्टल आणि साउथहँप्टनच्या मैदानात रंगणार आहेत. 

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडीजचा संघ

शाय होप (कर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसफ, ब्रँडन किंग, एविन लुई, गुडाकेश मोती, रोवमन पॉवेल, आंद्रे रसेल, शेरफाने रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड.

टॅग्स :टी-20 क्रिकेटवेस्ट इंडिजइंग्लंड