Join us  

IPL 2021: मोठी बातमी! किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं नावात केला बदल, लोगोही बदलला

IPL franchise Kings XI Punjab renamed Punjab Kings : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या नावात बदल करण्यात आला असून आता हा संघ पंजाब किंग्ज (Punjab Kings) या नावानं ओळखला जाणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 5:04 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेआधी किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) संघानं एक मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या नावात बदल करण्यात आला असून आता हा संघ पंजाब किंग्ज (Punjab Kings) या नावानं ओळखला जाणार आहे. (IPL franchise Kings XI Punjab is now Punjab Kings)

पंजाबच्या संघानं आपल्या नावात बदल केल्याचा निर्णय जाहीर केल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. संघाच्या नावासोबत नवा लोगो देखील लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. "पंजाब किंग्ज हा जबरदस्त ब्रँड म्हणून उदयास येईल आणि संघाच्या कोअर ब्रँडमध्ये बदल करण्याची व लक्ष केंद्रीत करण्याची ही योग्य वेळ आहे", असं पंजाब किंग्ज संघाचे सीईओ सतिष मेनन यांनी सांगितलं. 

IPL Auction 2021मध्ये या १३ खेळाडूंसाठी ८ फ्रँचायझींमध्ये रंगणार जबरदस्त चुरस!

"संघाच्या नावात आणि लोगोत बदल केल्यानं आमची फक्त ओळख बदलणार आहे असं अजिबात नाही. नवं नाव आणि ओळख ही संघाच्या एकीचं सेलिब्रेशन करण्याची वेळ आहे. आम्ही एका कुटुंबासारखे एक आहोत हे दाखवून देण्याची वेळ आहे. नव्या लोगोत एक जबरदस्त आक्रमकपणा आणि जीवंतपणा आहे", असंही मेनन म्हणाले. 

बस नाम ही काफी है! कोणतंही कारण नसताना ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये MS Dhoni

आयपीएलच्या जेतेपदासाठी उत्सुककिंग्ज इलेव्हन पंजाब संघ आता पंजाब किंग्ज नावानं ओळखला जाणार असला तरी २००८ सालापासून एकदाही स्पर्धेचं विजेतपद प्राप्त करता आलेलं नाही. त्यामुळे नव्या नावासह आणि लोगोसह नव्या दमानं यंदाच्या स्पर्धेत उतरण्याची तयारी पंजाब किंग्जनं केली आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. 

IPL 2021 Auction : आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण? ही आहे यादी...

पंजाब किंग्ज संघाचे मोहीम बुरमन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पौल हे सहमालक आहेत. गेल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत पंजाबच्या संघाला २०१४ साली उपविजेतेपद आणि २००८ सालच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेता आली होती.  

टॅग्स :आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनकिंग्स इलेव्हन पंजाबलोकेश राहुलख्रिस गेलआयपीएल