IPL Auction 2021मध्ये या १३ खेळाडूंसाठी ८ फ्रँचायझींमध्ये रंगणार जबरदस्त चुरस!

Players to watch out for at the IPL 2021 Auction इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनमध्ये ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनमध्ये ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत.चेन्नईत गुरुवारी हे ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनमध्ये १३ खेळाडूंसाठी फ्रँचायझींमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळेल. ( Players to watch out for at the IPL 2021 Mini Auction)

ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell), मुळ किंमत २ कोटी (Base Price: INR 2 Crores) - किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेला यूएईत साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे KXIPनं त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पण, नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये त्यानं १४३.५६च्या स्ट्राईक रेटनं ३७९ धावा चोपल्या. त्यामुळे उद्या होणाऱ्या लिलावात त्याच्यासाठी चुरस रंगसी तर आश्चर्य वाटायला नको. ( IPL Auction 2021, Date and time, Team list, Players List, Venue)

स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith), मुळ किंमत २ कोटी (Base Price: INR 2 Crores) - राजस्थान रॉयल्सला यूएईत अपयशाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली RRला अपयश आलं आणि त्यांनी स्मिथला रिलीज केलं. यंदाच्या मोसमात RRचं नेतृत्व संजू सॅमसन सांभाळणार आहे.

आरोन फिंच ( Aaron Finch), मुळ किंमत १ कोटी (Base Price: INR 1 Crore) - ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आरोन फिंच याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं रिलीज केलं. या खेळाडूसाठी चेन्नई सुपर किंग्स बोली लावू शकते. शेन वॉटसननं निवृत्ती जाहीर केल्यानंतर CSK त्याची रिप्लेसमेंट शोधत आहे. ( IPL Auction 2021 Player List)

कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson), मुळ किंमत ७५ लाख (Base Price: INR 75 Lakhs) - न्यूझीलंडच्या या गोलंदाजानं नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं ६ कसोटींत ३६ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय त्यानं फलंदाजीतही कमाल दाखवली आहे.

डेवीड मलान ( Dawid Malan), मुळ किंमत १.५ कोटी (Base Price: INR 1.5 Crores) - जागतिक ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या या फलंदाजासाठी जोरदार चुरस नक्की रंगेल. त्यानं आतापर्यंत १९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत ५३.४३च्या सरासरीनं ८५५ धावा चोपल्या आहेत. त्यात ९ वेळा ५०+ धावा केल्या, तर एका शतकाचा समावेश आहे. बिग बॅश लीगमध्येही त्यानं २६५ धावा कुटल्या.

शकिब अल हसन ( Shakib Al Hasan), मुळ किंमत २ कोटी (Base Price: INR 2 Crores) - एका वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून शकिब अल हसन पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय झाला आहे. पण, दुखापतीमुळे त्याला विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्सचा तो माजी खेळाडू आहे.

मुस्ताफिजूर रहमान ( Mustafizur Rahman), मुळ किंमत १ कोटी (Base Price: INR 1 crore) - सनरायझर्स हैदराबादला २०१६ चे जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या मुस्ताफिजूर रहमानसाठी मुंबई इंडियन्स आमइ कोलकाता नाइट रायडर्स बोली लावू शकतात. २०२०च्या आयपीएलसाठी त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डानं NOC दिली नव्हती.

झाय रिचर्डसन ( Jhye Richardson), मुळ किंमत १.५ कोटी (Base Price: INR 1.5 Crores) - बिग बॅश लिगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजानं २९ विकेट्स घेतल्या आहेत.

लकमन मेरिवाल ( Lukman Meriwala), मुळ किंमत २० लाख (Base Price: INR 20 Lakhs) - बडोदाचा हा डावखुऱ्या गोलंदाजानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दमदार कामगिरी केली आहे. बडोदाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला, परंतु त्यानं १५ विकेट घेत कमाल केली.

मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharuddeen), मुळ किंमत २० लाख (Base Price: INR 20 Lakhs) - केरळचा फलंदाज मोहम्मद अझरुद्दीननं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईच्या गोलंदाजांचा पाळापाचोळा करताना १३७ धावांची विक्रमी खेळी केली. त्यानं या स्पर्धेत पाच डावांमध्ये २१४ धावा कुटल्या.

शिवम दुबे ( Shivam Dube) मुळ किंमत ५० लाख (Base Price: INR 50 Lakhs) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या खेळाडूला यूएईत चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु हा अष्टपैलू खेळाडू कोणत्याही संघासाठी मॅचविनर ठरू शकतो.

अॅलेक्स हेल्स ( Alex Hales), मुळ किंमत, १.५ कोटी (Base Price: INR 1.5 Crores) - नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूनं पटकावला आहे. त्यानं १६१.६च्या स्ट्राईक रेटनं ५४३ धावा केल्या. त्यात ३० षटकार व ५४ चौकारांची आतषबाजी केली आहे.

शाहरुख खान ( Shahrukh Khan) मुळ किंमत २० लाख (Base Price: INR 20 Lakhs) - तामिळनाडूचा या खेळाडू मॅच विनर ठरू शकतो.

Read in English