Join us  

Big U-Turn : आयपीएलच्या पुढील पर्वात 10 संघ, लीगसाठी अधिकच्या विंडोसाठी आयसीसीसमोर झुकली बीसीसीआय

IPL 2021 Dates & Schedule – BCCI’s tradeoff with ICC? बीसीसीआयनं प्रत्येक वर्षाला आयसीसीच्या स्पर्धांच्या आयोजनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 4:17 PM

Open in App

IPL 2021 Dates & Schedule – BCCI’s tradeoff with ICC? बीसीसीआयनं प्रत्येक वर्षाला आयसीसीच्या स्पर्धांच्या आयोजनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी आयसीसीच्या प्रस्तावाला अध्यक्ष सौरव गांगुली यानं विरोध दर्शवला होता. पण, आता समोर आलेल्या माहितीनुसार इंडियन प्रीमिअर लीगसाठी अतिरिक्त विंडो मिळावी याकरिता बीसीसीआयनं त्यांच्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षा आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ मैदानावर उतरतील. अशात आयपीएलसाठी अधिकचा कालावधी गरजेचा आहे. 

Video : स्टम्पला लाथ मारणं, अम्पायरच्या अंगावर धावून जाणं पडलं महाग; शाकिब अल हसनवर तीन सामन्यांची बंदी 

1 जूनला झालेल्या बैठकीनंतर आयसीसीनं 2023 ते 2031 या कालावधीतील फ्यूचर टूअर प्रोग्रामची ( FTP) घोषणा केली. यानुसार प्रत्येक वर्षाला आयसीसीची एक स्पर्धा खेळवली जाणार आहे. क्रिकबजनं दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या या FTPला बीसीसीआयसह इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनीही सहमती दर्शवली आहे.  

ICC WTC Final: रिषभ पंतचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीनं केली गोलंदाजी, पाहा Video

आयपीएलमध्ये सध्या 8 संघ खेळतात आणि 52-54 दिवसांत 60 सामने खेळवले जातात. पण, पुढील पर्वात संघसंख्या वाढून 10 होईल आणि अशात सामन्यांची संख्या 76 किंवा 94 होऊ शकते. सध्याच्या फॉरमॅटनुसार 94 सामने होतील, तर संघांची दोन गटांत विभागणी केली तर 76 सामने होतील. यासाठी बीसीसीआयला 15 ते 20 अतिरिक्त दिवसांची गरज लागेल. त्यासाठीच बीसीसीआयनं त्यांचा पवित्रा बदलला.

पुढील दहा वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन; २०२७ च्या विश्वचषकात १४ संघांचा सहभाग

दुबई : पुढील दहा वर्षांत आयसीसीच्या २९ स्पर्धांचे आयोजन होईल. आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीपीनुसार २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ८-८ स्पर्धांचे आयोजन होईल. २०२७ च्या वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश असेल. २००३ नंतर प्रथमच सुपर सिक्स फाॅर्मेटमध्ये सामने खेळविले जातील.२०१८ ला रद्द झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा सुरू होणार असून, आघाडीचे आठ संघ स्पर्धेत सहभागी होतील. २००५ आणि २०२९ ला ही स्पर्धा होईल. टी-२० विश्वचषकासाठी सहभागी संघांची संख्या २० करण्यात आली आहे. यंदा भारतात टी-२० विश्वचषक आयोजित होत असून, २०२२ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. WIvsSA : वेस्ट इंडिजचे पराभवाचे द्विशतक, दक्षिण आफ्रिकेचा डावानं दणदणीत विजय 

महिला एफटीपी वेळापत्रकवर्ष     स्पर्धा     संघ     सामने२०२४     टी-२० विश्वचषक     १०     २३२०२५     वन डे विश्वचषक     ८     ३१२०२६     टी-२० विश्वचषक     १२     ३३२०२७     चॅम्पियन्स ट्रॉफी     ६     १६२०२८     टी-२० विश्वचषक     १२     ३३२०२९     वन डे विश्वचषक     १०     ४८२०३०     टी-२० विश्वचषक     १२     ३३२०३१     चॅम्पियन्स ट्रॉफी     ६     १६

पुरुष एफटीपी वेळापत्रकवर्ष     स्पर्धा     संघ     सामने२०२४     टी-२० विश्वचषक     २०     ५५२०२५     चॅम्पियन्स ट्रॉफी     ८     १५२०२५     डब्ल्यूटीसी फायनल     २     १२०२६     टी-२० विश्वचषक     २०     ५५२०२७     वन डे विश्वचषक     १४     ५४२०२७     डब्ल्यूटीसी फायनल     २     १२०२९     टी-२० विश्वचषक     २०     ५५२०२९     चॅम्पियन्स ट्रॉफी     ८     १५२०२९     डब्ल्यूटीसी फायनल     २     १२०३०     टी-२० विश्वचषक     २०     ५५२०३१     वन डे विश्वचषक     १४     ५४२०३१     डब्ल्यूटीसी फायनल     २     १

टॅग्स :बीसीसीआयआयसीसीआयपीएल २०२१