IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण

RCB Victory Parade Celebration: खेळाडूंची जंगी स्वागत करण्याचा प्लॅन फसला असला तरी चॅम्पियन्सचा खास सत्कार मात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:23 IST2025-06-04T15:15:58+5:302025-06-04T15:23:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL champions RCB's 'open bus parade' plan fizzled out; Fear of this happening was the reason behind it | IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण

IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB Cancels Open Bus Parade Bengaluru  Celebrations After Historic IPL 2025 Win : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाने अखेर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या हंगामात जेतेपद पटकावत १७ वर्षांचा दुष्काळ संपवला. आरसीबीच्या ताफ्यातील स्टार खेळाडू विराट कोहली पासून ते अगदी माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांच्यासह RCB च्या कट्टर चाहत्यांसाठी १८ वा हंगाम अविस्मरणीय ठरला. अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर पंजाब किंग्जला शह देत चॅम्पियन झालेल्या संघातील खेळाडूंचे बंगळुरुमध्ये जंगी स्वागत करण्याचा प्लॅनही आखण्यात आला होता. अहमदाबादच मैदान मारत फायनल जिंकल्यावर आरसीबीच्या अधिकृत अकाउंटवर संघातील खेळाडूंची खुल्या बसमधून जंगी मिरवणूक (Open Bus Parade) काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण हा प्लॅन आता फिस्कटला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण..

आरसीबीच्या विजयानंतर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.  १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेले यशानंतर बंगळुरुमध्ये खेळाडूंच्या जगी प्लॅनचा बेत आखण्यात आला होता. आरसीबीने विजय परेडची घोषणाही केली होती.  ४ जून रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी विधान सौधा ते RCB चं घरचं मैदान असलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत ओपन बस परेडसह खेळाडूंच स्वागत करण्याचा प्लॅन फ्रँचायझी संघाने आखला होता. पण शहरातील वाहतूक कोंडीच्या धास्तीमुळे हा प्लॅन आता रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Krunal Pandya :आधी मुंबई इंडियन्स अन् आता आरसीबी! थोरल्या पांड्यानं रचला नवा इतिहास

घरच्या मैदानावर होणार RCB चॅम्पियन्सचा सत्कार

आरसीबीला चॅम्पियन्स करणाऱ्या खेळाडूंची ओपन बस परेडचा डाव फसला असला तरी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान चॅमम्पियन संघाचा घरच्या मैदानात खास सत्कार सोहळा मात्र पार पडणार आहे. संघातील खेळाडू विधान सौधा येते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री  सिद्धारामैय्या भेट घेऊन नियोजित कार्यक्रमासाठी स्टेडियमवर जातील. स्टेडियममधील आयोजित कार्यक्रमासाठी फक्त पासधारक लोकांनाच एन्ट्री दिली जाणार आहे.   

Web Title: IPL champions RCB's 'open bus parade' plan fizzled out; Fear of this happening was the reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.