विश्वचषकापेक्षा आयपीएलच फायद्याचे

कोरोनामुळे स्थिती आणखी बिकट झाली नाही तर इंग्लंड जुलैमध्ये वेस्ट इंडिज व पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी आमंत्रित करू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:26 AM2020-05-31T04:26:34+5:302020-05-31T04:26:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL is better than the World Cup | विश्वचषकापेक्षा आयपीएलच फायद्याचे

विश्वचषकापेक्षा आयपीएलच फायद्याचे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आ यसीसीने शुक्रवारी झालेल्या बहुचर्चित बैठकीत क्रिकेट स्पर्धांच्या आयोजना संदर्भातील सर्व निर्णय लांबणीवर टाकल्यामुळे टी-२० वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेच्या भवितव्याचा निर्णय गुलदस्त्यातच राहिला. त्याचबरोबर नेहमी मे महिन्यात संपणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाबाबतचा निर्णयही अधांतरी राहिला.
मात्र, जर कोरोनामुळे स्थिती आणखी बिकट झाली नाही तर इंग्लंड जुलैमध्ये वेस्ट इंडिज व पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी आमंत्रित करू शकतो. मात्र, मुख्य मुद्दा वर्ल्ड टी-२० व आयपीएलचा आहे. आयपीएल यापूर्वीच पुढे ढकलण्यात आली असून, वर्ल्ड टी-२० च्या वेळापत्रकात सध्यातरी कोणताही बदल केलेला नाही. या दोन्ही स्पर्धा वेगवेगळ्या असल्या तरी सध्या त्या एकमेकांशी बांधल्या गेल्या आहेत.
या खेळातील तज्ज्ञ, आजी-माजी खेळाडू, प्रशासक व खेळातील भांडवल गुंतविणाऱ्यांच्या मते आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाºया वर्ल्ड टी-२०पेक्षा आयपीएलच खेळविले जावे. यासंदर्भातील कारणांची मीमांसा मी मागील काही लेखांमध्ये केली आहे. इथे हे पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे कोविड-१९ नंतर मैदानावर प्रेक्षक येण्याबाबत शंका असल्यामुळे प्रत्येक देशाच्या क्रिकेट मंडळावर मोठा दबाव आहे.
१६ संघांतील क्रिकेटपटू व सहयोगी कर्मचाºयांचे विलगीकरण करण्याबरोबर मैदानावर प्रेक्षक उपस्थित नसल्यामुळे महसूल मिळविण्याचे आयोजकांसमोर मोठे आव्हान आहे. मैदानावर विकले जाणारे खाद्यपदार्थ व अन्य गोष्टींमधून मिळणाºया उत्पन्नालाही मुकावे लागणार आहे. याचा मोठा परिणाम आयोजनावर होणार आहे. जागतिक अर्थकारणच विस्कळीत झाल्यामुळे आॅस्ट्रेलियालाही याची झळ बसली आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी होणाºया खर्चापेक्षा मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ कसा साधायचा, हा प्रश्न आहे. तिकीट विक्री व अन्य महसुलाचा विचार करता आयपीएल रद्द करण्यापेक्षा वर्ल्ड टी-२० पुढे ढकलणे आयसीसीच्या फायद्याचे असणार आहे. बीसीसीआयलाही (पडद्यामागील काही किक्रेट मंडळांनाही) हाच विश्वास वाटतो.
आॅस्ट्रेलियासाठी या वर्षाअखेरीस चार कसोटी सामन्यांची मालिका, तसेच भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यान, एकदिवसीय व टी-२० सामन्यांचे आयोजन असा भरगच्च कार्यक्रम दिल्यानंतर त्यांनाही वर्ल्ड टी-२० पेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. या दोन क्रिकेट मंडळांमधील संबंध पाहता वर्ल्ड टी-२० ऐवजी आयपीएलचे आयोजन अशक्य नाही.
अशा स्थितीत आॅस्ट्रेलियासाठी ही आॅफर खूपच फायदेशीर आहे. आगामी स्पर्धांच्या वेळापत्रकात वर्ल्ड टी-२०चे आयोजन २०२२ मध्ये करण्याचे ठरविले तर आयपीएलसाठी आॅस्ट्रेलिया वर्ल्ड टी-२० सोडून द्यायला तयार होईल. अर्थात हे सगळे केवळ ठोकताळे आहेत. सध्या संपूर्ण क्रिकेट ठप्प झाले असताना या सगळ्यांकडे आयसीसी कसे पाहते हे आपल्याला १० जूनलाच कळेल.

आयपीएललाही प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबतचा प्रश्न सतावू शकतो. सामन्याच्या आयोजनासंदर्भातील आयसीसी व भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आयोजकांना करावेच लागणार आहे; अन्यथा या स्पर्धेला मान्यता मिळणार नाही. मात्र, आयपीएलची टीव्हीवर असणारी लोकप्रियता ही खूपच मोठी आहे. मैदानावर प्रेक्षकांची उपस्थिती नसली तरी या स्पर्धेच्या लोकप्रियतेत कमी येण्याची शक्यता नाही. वर्ल्ड टी-२० च्या तुलनेत आयपीएलला प्रसारणातून मिळणारा फायदा मोठा असू शकेल.

Web Title: IPL is better than the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.