Join us

IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!

Rohit Sharma Mumbai Indians Will Jacks, IPL Auction 2025 Players Sold List: गेल्या हंगामाता 'या' स्टार खेळाडूने RCB कडून खेळताना ठोकलं होतं धमाकेदार शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 19:12 IST

Open in App

Rohit Sharma Mumbai Indians Will Jacks, IPL Auction 2025 Players Sold List: आयपीएलच्या मेगालिलावात मुंबई इंडियन्सच्या संघमालकांनी दुसऱ्या दिवशी दमदार शॉपिंग केल्याचे दिसून आले. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सध्या दोन दिवसीय लिलाव सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या संघानेही लिलावासाठी जोरदार तयारी केली असल्याचे सांगितले जात होते. या तयारीचा अंदाज कालच्या पहिल्या दिवसात फारसा आला नाही. पहिल्या दिवशी अवघे ४ खेळाडू खरेदी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने दुसऱ्या दिवशी रोहित शर्मासाठी नवा ओपनिंग पार्टनर शोधला अन् संघात घेतला. गेल्या वर्षी विराट कोहलीच्या RCB कडून खेळणाऱ्या विल जॅक्स या धडाकेबाज फलंदाजाला मुंबईने ५ कोटी २५ लाखांच्या बोलीसह संघात घेतले.

------

जागेवरून उठत मानले RCB चे आभार

'या' खेळाडूने गेल्या हंगामात RCB कडून शतक ठोकलं होतं. त्यामुळे मुंबईने त्याला विकत घेतल्यावर RCB कडे RTM ची संधी होती, पण त्यांनी त्याचा वापर केला नाही. त्यामुळे आकाश अंबानी यांनी उठून त्यांचे आभार मानले.

विल जॅक्सच्या आधी मुंबई इंडियन्सने दोन बडे खेळाडू संघात घेतले. लिलावाआधी करारमुक्त केलेल्या इशान किशनच्या जागी विकेट किपर म्हणून मुंबईने अवघ्या १ कोटी रुपयांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा रायन रिकल्टन याला ताफ्यात सामील करून घेतले. तसेच, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासह तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मुंबईने दीपक चहरलाही संघात घेतले. दीपक चहरला ९ कोटी २५ लाखांच्या मोठ्या बोलीवर मुंबई इंडियन्सने ताफ्यात दाखल करून घेतले.

मुंबई इंडियन्सचा संघ पाच खेळाडूंना कायम ठेवून लिलावात उतरला होता. त्यांनी जसप्रीत बुमराहला सर्वाधिक १८ कोटींना संघात रिटेन केले. सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या या दोघांना प्रत्येकी १६ कोटी ३५ लाख रुपयांच्या रकमेसह संघात कायम ठेवले. रोहित शर्माला १६ कोटी ३० लाख रुपयांसह रिटेन केले. तर तिलक वर्माला ८ कोटींसह संघात कायम ठेवले.

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सविराट कोहलीरोहित शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोर