Top 10 most expensive players, IPL Auction 2025 Day 1: जगातील सर्वात श्रीमंत आणि स्पर्धात्मक समजली जाणारी टी२० स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामीसाठी मेगालिलाव होत आहे. २४ आणि २५ नोव्हेंबरला जेद्दाह येथे तब्बल ५७७ खेळाडूंचे भवितव्य ठरत आहेत. दोन दिवसीय लिलाव प्रक्रियेतील पहिल्या दिवशी अनेक बड्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली. अपेक्षेप्रमाणे भारताचा रिषभ पंत २७ कोटींसह आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनौ सुपरजायंट्स संघाने हा इतिहास रचला. त्यापाठोपाठ पंजाब किंग्ज संघाने भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला २६ कोटी ७५ लाख रुपयांच्या बोलीसह संघात विकत घेतले. नेहमी विदेशी खेळाडूंना मोठी बोली लागणाऱ्या लिलावात भारतीय खेळाडू मालामाल झाले. त्यातही युवा भारतीय खेळाडूंवर भविष्याचा विचार करता धमाकेदार बोली लावण्यात आल्या. पाहूया आजच्या दिवसातील सर्वात महागडे १० खेळाडू कोण ठरले…
मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसातील टॉप 10 महागडे खेळाडू-
- रिषभ पंत - लखनौ सुपरजायंट्स - २७ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- श्रेयस अय्यर - पंजाब किंग्ज - २६ कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- वेंकटेश अय्यर - कोलकाता नाइट रायडर्स - २३ कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- अर्शदीप सिंग - पंजाब किंग्ज - १८ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- युजवेंद्र चहल - पंजाब किंग्ज - १८ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- जॉस बटलर - गुजरात टायटन्स - १५ कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- केएल राहुल - दिल्ली कॅपिटल्स - १४ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- ट्रेंट बोल्ट - मुंबई इंडियन्स - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- जोफ्रा आर्चर - राजस्थान रॉयल्स - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- जोश हेजलवूड - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)