Join us

IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली

मुंबई इंडियन्सनं विकेट किपर बॅटरच्या गटातील बोलीसाठी जागी झाल्यामुळे ते भारतीय विकेट किपर बॅटर ईशान किशनला  पुन्हा आपल्या ताफ्यात घेतील असेच वाटत होते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 20:48 IST

Open in App

IPL Auction 2025  : आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाच्या टेबलवर बराच काळ शांतता होती. मार्की खेळाडूंच्या दोन्ही सेटमध्ये ते MI नं फक्त बघ्याची भूमिका निभावली. विकेट किपर बॅटरचा नंबर आल्यावर मुंबई इंडियन्स जागी झाली. क्विंटन डिकॉकवर त्यांनी डाव खेळण्याचा निर्णय घेतला. ही मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात बोलीसाठी पॅडल उचलण्याची पहिली वेळ होती. पण तो काही त्यांच्या हाती लागला नाही.

MI नं रस दाखवला, पण अधिक पैसा खर्च करण्याची तयारी नाही दाखवली

मुंबई इंडियन्सनं विकेट किपर बॅटरच्या गटातील बोलीसाठी जागी झाल्यामुळे ते भारतीय विकेट किपर बॅटर ईशान किशनला  पुन्हा आपल्या ताफ्यात घेतील असेच वाटत होते. रिलीज केलेल्या या खेळाडूवर मुंबई इंडियन्सनं रस दाखवला. पण त्याला ताफ्यात घेण्यासाठी जे प्रयत्न करायला हवे होते ते त्यांनी केले नाही. अर्थात MI नं त्याच्यासाठी फार मोठी खर्च करण्याची तयारीच दाखवली नाही.

विकेट किपर बॅटरचा भरणा असलेल्या SRH च्या मालकीण बाईंनी जिंकला फायनल डाव

दुसरीकडे रिटेन रिलीजच्या खेळातच विकेट किपर बॅटरचा संघात भरणा असणाऱ्या सनरायझर्स हैदराबादनं या युवा भारतीय विकेट किपर बॅटरवर डाव खेळला. पंजाब आणि मुंबई इंडियन्सला मागे टाकत काव्या मारन यांनी फायनल बाजी मारली. ईशान किशन याला ११.२५ कोटी रुपयांत SRH संघानं आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. त्यामुळे ब्लू जर्सीत दिसणारा ईशान किशन आगामी हंगामात ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे.

MI कडून १०० पेक्षा अधिक सामने खेळला, पण आता मिळाला नवा संघ

२०१८ पासून २०२४ च्या हंगामापर्यंत ईशान किशन हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला. या फ्रँचायझी संघासोबतचे त्याचे कमालीचे बॉन्डिंगही पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून १०५ आयपीएल सामन्यात त्याने २६४४ धावा केल्या आहेत. ९९ ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी आहे. आगामी हंगामात पहिल्यांदाच तो नव्या फ्रँयायझीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. 

IPL मेगा लिलावात देश विदेशातील खेळाडूंची गर्दी 

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ मध्ये होणाऱ्या मेगा लिलावासाठी देश विदेशातील एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील ५७४ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर सौरव नेत्रावळकर, जोफ्रा आर्चर आणि हार्दिक तामोरे यांचाही यादीत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे लिलावातील खेळाडूंचा आकडा हा ३६७ भारतीय आणि २१० परदेशी खेळाडूंसह एकूण ५७७ असा झाला.

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२४मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादइशान किशन