आयपीएलच्या मेगा लिलावात देवदत्त पडिक्कल हा पहिला अनसोल्ड खेळाडू ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवणाऱ्या या खेळाडूनं टॉप ऑर्डर बॅटरच्या यादीतून नाव नोंदणी केली होती. पण त्याला एकाही फ्रँचायझीनं आपल्या ताफ्यात घेण्याची उत्सुकता दाखवली नाही.
IPL मध्ये भारतीय युवा बॅटरच्या खात्यात १५०० धावा
२४ वर्षीय डावखुरा फलंदाज गत हंगामात लखनऊ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले होते. त्याआधी तो राजस्थान रॉयल्स संघाचाही भाग राहिला आहे. २०२० आणि २०२१ च्या हंगामात त्याने लक्षवेधी कामगिरीही करून दाखवली होती. आयपीएलमध्ये त्याने १२३ च्या स्ट्राइक रेटनं १५०० धावा केल्या आहेत.
डेविड वॉर्नरलाही लागला अनसोल्डचा टॅग
देवदत्त पडिक्कलशिवाय डेविड वॉर्नर हा अनसोल्ड राहणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. २००९ पासून दिल्ली आणि हैदराबादच्या संघाकडून खेळणाऱ्या या खेळाडूला संघात घेण्यात कुणीच रस दाखवला नाही. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो बिग बॅश लिगमध्ये खेळत आहे. आयपीएलमधील धावांच्या जोरावर २ कोटींसह त्याने नाव नोंदणी केली आहे. पण त्याच्यावर अनसोल्ड राहण्याची वेळ आली आहे.