IPL Auction 2025 Players : भारतीय टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी जलगती गोलंदाज अर्शदीप सिंगवर मेगा लिलावात मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. मेगा लिलावात बोली लागणार तो पहिला खेळाडू ठरला. पंजाब किंग्सच्या संघाने रिलीज केल्यानंतर या जलगती गोलंदाजानं २ कोटी या मूळ किंमतीसह मेगा लिलावात नाव नोंदणी केली होती. डावाच्या सुरुवातीसह डेथ ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या या गोलंदाजाला मेगा लिलावात मोठा भाव मिळणार हे जवळपास निश्चित होते. तो कोणत्या संघातून खेळणार याचीही उत्सुकता होती. पंजाबच्या संघानं RTM चा डाव खेळत १८ कोटीसह त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
पहिल्यांदाच आल अर्शदीपच नाव; प्रीतीन खेळला यशस्वी डाव
अर्शदीपसाठी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात सुरुवातीला फाईट झाली. चेन्नई आउट झाल्यावर गुजरातच्या संघानं एन्ट्री मारली. मग राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सचा संघ आउट झाल्यावर काव्या मारन यांनी अर्शदीपसाठी कंबर कसली. पण शेवटी पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा हिने आपली चाल खेळली. तिने RTM चा वापर करत अर्शदीप सिंगला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं.
२० लाख ते कोट्यधीश! असा आहे अर्शदीपचा पंजाब किंग्ससोबतचा प्रवास
पंजाबच्या या युवा जलगती गोलंदाजानं २० लाख या मूळ किंमतीसह २०१९ मध्ये पंजाबच्या संघाकडून आयपीएलमध्ये एन्ट्री मारली. पहिल्या ३ हंगामात तो याच किंमतीसह अगदी हिंमतीन मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. २०२२ च्या हंगामासाठी पंजाबच्या संघाने त्याला ४ कोटीसह रिटेन केले होते. पुढचे तिन्ही हंगामात ४ कोटीसह पंजाबच्या ताफ्यातून दिसल्यावर आता त्याची किंमत आणखी वाढली आहे.