सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात रंगलेल्या आयपीएल मेगा लिलावात MI ची संघ बांधणी करण्यासाठी आकाश अंबानी आणि नीता अंबानी याआधीच्या IPL लिलावाप्रमाणेच ऑक्शन टेबलवर उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले.
अन् आकाश अंबानींनी विरोधी फ्रँचायझी संघाचं मानलं आभार
आयपीएल स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानात जशी दोन फ्रँचायझी संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते, तोच क्षण लिलावात संघ बांधणी करताना दोन फ्रँचायझी संघाला लीड करत असणाऱ्या चेहऱ्यांबमध्येही दिसून येतो. एखाद्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझी संघ एकमेकांना भिडतात. पण यंदाच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुु यांच्यात एक वेगळाच सीन पाहायला मिळाला.
RCB मुळं MI ची डिल झाली फायनल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या कृपेनं MI ला आपल्याला हवा तो खेळाडू मिळवणं सोपे झालं. त्यानंतर आकाश अंबानी यांनी आपल्या जागेवरून उठत बिडिंग वॉरमधून मागे हटणाऱ्या फ्रँयायझी संघाचे आभार मानल्याचा सीन पाहायला मिळाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
नेमकं काय घडलं? आकाश अंबानींनी का मानले RCB चे आभार?
IPL च्या गत हंगामात RCB कडून खेळताना गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात ४१ चेंडूत शतक झळकावणारा इंग्लंडचा स्फोटक फलंदाज विल जॅक्ससाठी मुंबई इंडियन्सनं डाव खेळला. २ कोटी मूळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी MI नं ५.२५ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मोजली. RCB च्या संघाकडे त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी RTM चा पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे फायनल बोली लागल्यावर आकाश अंबानी थोडे नर्व्हस दिसले. कारण RCB ला RTM चा वापर करुनं MI डाव हाणून पाडता आला असता. पण RCB नं राईट टू मॅच कार्ड वापरणार नसल्याचे स्पष्ट केले, अन् आकाश अंबानींचा जीव भांड्यात पडला. त्यांचा आनंद गगनात मावेना असा सीन पाहायला मिळाला. ते आपल्या खुर्चीवरून उठून थेट RCB च्या ऑक्शन टेबलकडे गेले. आकाश अंबानींनी हस्तांदोलन करत RCB व्यवस्थापन सदस्य मंडळींचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले.