Jofra Archer Mumbai Indian to Rajasthan Royals, IPL Auction 2025 Players Live : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी देश-विदेशातील एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील फक्त ५७७ खेळाडूंना अंतिम यादीत स्थान देण्यात आले. अनेक स्टार क्रिकेटर्सची नावे यात समाविष्ट केली होती. त्यापैकीच एक नाव असलेल्या इंग्लंडचा जोफ्रा आर्चर याला लिलावात चांगली किंमत मिळाली. गेल्या वेळी लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्राला विकत घेतले होते पण दुखापतीमुळे तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे अखेर मुंबईने त्याला रिलीज केले. या लिलावात तो २ कोटींच्या मूळ किंमतीसह मैदानात उतरला. लिलाव सुरु होऊन तब्बल ५ तास होऊनही एकही खेळाडू न खरेदी केलेल्या राजस्थान यावेळी डाव साधला. RR ने जोफ्रा आर्चरला १२ कोटी ५० लाखांना आपल्या ताफ्यात घेतले.
जोफ्राने सुरुवातीला आयपीएलसाठी नाव नोंदणी केली होती. पण मेगा लिलावाची जी अंतिम यादी जाहीर करण्यात आली त्यातून त्याचे नाव गायब झाल्याचे पाहायला मिळाले होते. अंतिम यादीत नाव नसेल तर हा खेळाडू लिलावातून बाद झाला असेच मानले जात होते. पण जोफ्रा आर्चरच्या बाबातीत मात्र वेगळाच सीन क्रिएट झाला आहे. आयत्या वेळी त्याची लिलावात एन्ट्री झाली आणि त्याने तगडी रक्कम मिळवली.
राजस्थान रॉयल्स संघ लिलावात ६ खेळाडूंसह पोहोचला त्यांनी संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीला प्रत्येकी १८-१८ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले. ध्रुव जुरेल आणि रियान पराग या दोघांना प्रत्येकी १४-१४ कोटी रुपये देऊन रिटेन केले. वेस्टइंडीजच्या शिमरॉन हेटमायरला ११ कोटी रुपयांसह संघात कायम ठेवले. तर संदीप शर्मा याला चार कोटींसह रिटेन केले.