Top 10 Unsold Players, IPL Auction 2025 Day 1: जगातील सर्वात श्रीमंत अशा आयपीएल स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी सध्या लिलाव सुरु आहे. २४ आणि २५ नोव्हेंबरला जेद्दाह येथे तब्बल ५७७ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. त्यातील पहिल्या दिवशी लिलाव प्रक्रिया संपुष्टात आली असून त्यात ७२ खेळाडूंना विविध संघांनी आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले. या ७२ खेळाडूंपैकी २४ खेळाडू परदेशी आहेत. तर उर्वरित खेळाडू भारतीय आहेत. आजच्या दिवसभरात एकूण ८४ खेळाडू विक्रीसाठी ठेवण्यात आले, त्यापैकी १२ खेळाडूंना कुणीही खरेदीदार मिळाला नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सह १२ बडे खेळाडू अनसोल्ड राहिले. जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू…
पहिल्या दिवसाच्या लिलावात न विकले गेलेले खेळाडू-
- देवदत्त पडिक्कल - मूळ किंमत २ कोटी - UNSOLD
- डेव्हिड वॉर्नर - मूळ किंमत २ कोटी - UNSOLD
- जॉनी बेअरस्टो - मूळ किंमत २ कोटी - UNSOLD
- वकार सलामखेल - मूळ किंमत ७५ लाख - UNSOLD
- पियुष चावला - मूळ किंमत ५० लाख - UNSOLD
- कार्तिक त्यागी - मूळ किंमत ४० लाख - UNSOLD
- यश धूल - मूळ किंमत ३० लाख - UNSOLD
- अनमोलप्रीत सिंग - मूळ किंमत ३० लाख - UNSOLD
- उत्कर्ष सिंग - मूळ किंमत ३० लाख - UNSOLD
- लुवनिथ सिसोदिया - मूळ किंमत ३० लाख - UNSOLD
- उपेंद्र सिंह यादव - मूळ किंमत ३० लाख - UNSOLD
- श्रेयस गोपाल - मूळ किंमत ३० लाख - UNSOLD