Join us

IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?

Vaibhav Suryavanshi Rajasthan Royals, IPL Auction 2025 Players List: ज्या लिलावात डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन सारखे बडे खेळाडू अनसोल्ड राहिले, त्यात एका चिमुरड्याने करोडपती होण्याचा मान मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 20:55 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi Rajasthan Royals, IPL Auction 2025 Players List: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू म्हणून मेगालिलावात उतरलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीने इतिहास रचले. ज्या लिलावात डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन सारखे बडे खेळाडू अनसोल्ड राहिले, त्यात एका चिमुरड्याने करोडपती होण्याचा मान मिळवला. ३० लाखांच्या मूळ किमतीवरून त्याची बोली सुरु झाली होती. अनेक संघांनी त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्न केला. अखेर राजस्थान रॉयल्स संघाची बोली यशस्वी ठरली. IPL इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलेल्या वैभव सूर्यवंशीचे राजस्थानने १ कोटी १० लाखांच्या बोलीसह रॉयल स्वागत केले.

-----

वैभवने ५ जानेवारी २०२४ मध्ये रणजी स्पर्धेत पदार्पण केलं. ज्या शहरात वडिलांनी केवळ उन्हात बसून क्रिकेट खेळणारी मुलं पाहिली, त्याच शहराच्या मातब्बर संघाविरुद्ध त्यांच्या लेकाने पदार्पण केलं. पुढे १९ वर्षाखालील संघात वैभवची निवड झाली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वैभवने फक्त ५८ चेंडूत १०४ धावा केल्या. १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभवच्या नावावर विश्वविक्रम आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघ लिलावात ६ खेळाडूंसह पोहोचला त्यांनी संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीला प्रत्येकी १८-१८ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले. ध्रुव जुरेल आणि रियान पराग या दोघांना प्रत्येकी १४-१४ कोटी रुपये देऊन रिटेन केले. वेस्टइंडीजच्या शिमरॉन हेटमायरला ११ कोटी रुपयांसह संघात कायम ठेवले. तर संदीप शर्मा याला चार कोटींसह रिटेन केले.

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावराजस्थान रॉयल्सभारतीय क्रिकेट संघ19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनल