Join us

IPL Auction 2024 : स्वप्नातही विचार केला नव्हता! मिचेल स्टार्कला सुखद धक्का; म्हणतो, माझी पत्नी....  

ऑस्ट्रेलियाच्याच्या मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) सर्वाधिक बोली लागली गेली. कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ लाख स्टार्कसाठी मोजले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 18:15 IST

Open in App

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स ( captain Pat Cummins) याला दसपट किंमत मिळाली. २ कोटी मुळ किंमत असलेल्या पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २० कोटी मोजले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच्या मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) सर्वाधिक बोली लागली गेली. कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ लाख स्टार्कसाठी मोजले. या विक्रमी बोलीनंतर स्टार्कने आश्चर्य व्यक्त केले...

CSK, MI, RCB च्या नाकावर टिच्चून SRH ने पॅट कमिन्सला घेतले; जाणून घ्या कसे डावपेच आखले

तो म्हणाला, "हा नक्कीच धक्का होता. माझी पत्नी अॅलिसा भारतातील महिला संघासोबत आहे त्यामुळे मी स्क्रीनवर जे पाहत होतो त्यापेक्षा तिला लवकर अपडेट मिळत होते. आश्चर्यचकित पण रोमांचित. आमच्या कसोटी संघाचा व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये डिनरसाठी मागणी होतेय. बॉक्सिंग डे कसोटीच्या आधी काहीतरी करायचे आहे. पॅट कमिन्स व माझ्यासाठी ही रात्र खास आहे."

८ वर्षानंतर आयपीएलमध्ये परतण्याच्या निर्णयावर स्टार्क म्हणाला, ''मी २०१४-१५ मध्ये आरसीबीमध्ये सहभागी होतो, त्यानंतर २०१८ मध्ये केकेआरने मला संघात घेतले, पण मला दुखापत झाली. मी ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत आहे. परत येत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप समोर असल्याने सर्वोत्तम ट्वेंटी-२० लीगमध्ये स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची चांगली संधी आहे."

 "मला स्वप्नातही वाटले नव्हते की, एवढी रक्कम मला मिळेल. काही संघ त्यांच्या गोलंदाजी आक्रमणांना बळ देण्याचा विचार करत होते,पण त्या यादीत अनेक महान गोलंदाज आहेत. पॅट सनरायझर्समध्ये गेला आहे, पण तो केकेआरमध्ये होता आणि मला आशा आहे त्याची उणीव मी भरून काढेन. फोनवर काही मेसेज येत होते,''असेही तो म्हणाला.  

टॅग्स :आयपीएल लिलावकोलकाता नाईट रायडर्स