CSK, MI, RCB च्या नाकावर टिच्चून SRH ने पॅट कमिन्सला घेतले; जाणून घ्या कसे डावपेच आखले

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज विक्रमी बोली लावली गेली. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स ( captain Pat Cummins) याला दसपट किंमत मिळाली.

२ कोटी मुळ किंमत असलेल्या पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २० कोटी मोजले. आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यांनी कमिन्ससाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही मध्येच एन्ट्री घेतली होती, परंतु या सर्वांच्या नाकावर टिच्चून SRH ने य़ा खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले....

२ कोटी मुळ किंमत असलेल्या पॅट कमिन्ससाठी सर्व संघ बोली लावतील अशी अपेक्षा होती. आयपीएलमधील दोन यशस्वी संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ४.८ कोटीपर्यंत कमिन्ससाठी स्पर्धा रंगली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५ कोटींची बोली लावून स्पर्धेत प्रवेश केला. CSK पॅडल उचलण्यासाठी जरासाही वेळ घेतला नाही. चेन्नई व बंगळुरू यांच्यात ७.४० कोटीपर्यंत टक्कर रंगली. बंगळुरूने ७.८० कोटीचीं सर्वाधिक बोली लावली.

यानंतर सनरायझर्स हैदराबादने सरप्राईज एन्ट्री घेतली आणि कमिन्सचा भाव ८.४० कोटींपर्यंत नेला. हैदराबाद व बंगळुरू या दोन संघांमध्ये १० कोटींपर्यंत चढाओढ पाहायला मिळाली. पुढे १२ कोटीपर्यंत ही स्पर्धा रंगली.

कोलकाता नाइट रायडर्सच्या माजी खेळाडूवर बंगळुरूने १२.७५ कोटी बोली लावली, आता हैदराबाद माघार घेतील असे वाटलेले, परंतु ट्रॅव्हिस हेडनंतर त्यांनी संपूर्ण फोकस कमिन्सवर केला होता. १७ कोटींची बोली हैदराबादने लावली.

बंगळुरूने १८.५ कोटींची बोली लावल्यानंतर कमिन्स आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरेल, हे स्पष्ट झाले. अखेर सनरायझर्स हैदराबादने २० कोटींची बोली लावून सर्वांना बॅकफूटवर फेकले. सनरायझर्सने २०.५० कोटींत विश्वविजेत्या कर्णधाराला आपलेसे केले.