Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्स ( Punjab Kings) बटव्यात सर्वाधिक ७२ कोटी घेऊन दाखल होणार आहेत. लोकेश राहुलने ( KL Rahul) संघ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंजाब किंग्सनं आयपीएल २०२२ साठी मयांक अग्रवाल ( १२ कोटी) व अर्षदीप सिंग ( ४ कोटी) यांना कायम राखले. त्यामुळे सर्वाधिक ७२ कोटी रक्कमेत ते कोणकोणत्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतात याचीच उत्सुकता आहे. पण, ऑक्शनचा हा थरार सह मालकीण प्रीती झिंटा ( Preity Zinta) हिला प्रथमच घरात बसून अनुभवायला लागणार आहे. अशात तिने आज केलेलं एक ट्विट व्हायरल झालं आहे...
प्रीती झिंटा का होणार नाही सहभागी?
मागील नोव्हेंबर महिन्यात प्रीती आणि तिचा पती जेन गुडनॉफ यांनी त्यांच्या घरी जुळी बाळं जन्माला आल्याची आनंदाची बातमी दिली. त्यामुळे यंदा प्रीतीने आयपीएल ऑक्शनला हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिने ट्विट केले की,''माझ्या लहान बाळांना इथे सोडून मी भारतासाठी प्रवास करू शकत नाही आणि त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात मी सहभाग घेणार नाही. मागील काही दिवसांपासून ऑक्शन संदर्भात वारंवार आम्ही चर्चा केली.''
आज तिने आणखी एक ट्विट केले आहे. त्यात तिने लिहिले की,''TATA IPL Auction पाहण्यासाठी सज्ज आहे. यावेळेत माझ्या हातात रेड ऑक्शन पॅडल ऐवजी लहान बाळ असल्याचा आनंद निराळाच आहे. पण, खरं सांगायचं तर PBKSचा नवा संघ कसा असेल यासाठी उत्सुक आहे. चला ठरलेल्या रणनीतीवर काम करूया...''