Join us  

IPL Auction 2021 : १ चेंडूंत १७ धावा देणाऱ्या गोलंदाजासाठी पंजाब किंग्सनं मोजले ८ कोटी!

IPL Auction 2021 : Riley Meredith 17 runs off 1 legal delivery भारताचे समालोचक हर्षा भोगले यांनीही सोशल मीडियावर यामागचं कारण काय? असा सवाल केला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 18, 2021 5:56 PM

Open in App

IPL Auction 2021 : ख्रिस मॉरिस ( Chris Morris) - १६.२५ कोटी, ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell)- १४.२५ कोटी, झाय रिचर्डसन ( Jye Richardson) -  १४ कोटींची बोली लागली.. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एका ऑक्शनमध्ये तीन खेळाडूंवर १४ किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची बोली लावली गेली. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) करिअप्पा गोवथमला ९.२५ कोटींत आपल्या ताफ्यात घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अनकॅप खेळाडूला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे. पण, प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सनं ( Punjab kings) कमालच केली आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या एका गोलंदाजासाठी चक्क ८ कोटी मोजले. ( Riley Meredith had once conceded 17 runs off 1 legal delivery) IPL Auction 2021 Live Today,

शाहरुख खान खेळणार प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सकडून; २० लाखांहून थेट ५.२५ कोटींची भरारी

पंजाब किंग्सनं २० लाख मुळ किंमत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या रिली मेरेडीथसाठी ८ कोटी मोजले. पण, याच गोलंदाजानं २०१९च्या बिग बॅश लिगमध्ये एका चेंडूंत १७ धावा दिल्याचा लाजीरवाणा विक्रम नावावर केला होता. होय हे खरं आहे.... मेलबर्न रेनेगॅड्स व होबार्ट हरिकेन्स यांच्यातल्या सामन्यात हा नकोसा विक्रम नोंदवला गेला. हरिकेन्सच्या गोलंदाजांना १८४ धावांचा बचाव करायचा होता. पण, मेरेडीथनं पहिल्याच षटकात २३ धावा दिल्या. त्यानं तीन नो बॉल आणि पाच व्हाईड बॉल टाकले होते. विशेष म्हणजे त्यानं पहिल्याच चेंडूवर १७ धावा दिल्या होत्या. PL Auction 2021 Latest Marathi News

पाहा व्हिडीओ...

मुस्तफिजुर रेहमान बांगलादेश१ कोटीराजस्थान रॉयल्स (१ कोटी)
जाय रिचर्डसनऑस्ट्रेलिया१.५० कोटीपंजाब किंग्स (१४ कोटी)
नॅथन कुल्टरनाईलऑस्ट्रेलिया१.५० कोटीमुंबई इंडियन्स (५ कोटी)
शेल्डन कॉट्रेलवेस्ट इंडिज१ कोटीअनसोल्ड
उमेश यादवभारत१ कोटीदिल्ली कॅपिटल्स (१ कोटी)
आदिल राशिदइंग्लंड१.५० कोटीअनसोल्ड
राहुल शर्माभारत५० लाखअनसोल्ड
मुजीब उर रहमानअफगाणिस्तान१.५० कोटीअनसोल्ड
हरभजनसिंगभारत२ कोटीअनसोल्ड
इश सोढीन्यूझीलंड५० लाखअनसोल्ड
पियूष चावलाभारत५० लाखमुंबई इंडियन्स (२ कोटी ४० लाख)
कैस अहमदअफगाणिस्तान५० लाखअनसोल्ड
सी. हरी निशांतभारत२० लाखअनसोल्ड
सचिन बेबीभारत२० लाखRCB (२० लाख)
राहुल गहलोतभारत२० लाखअनसोल्ड
रजत पाटीदारभारत२० लाखRCB (२० लाख)
हिम्मत सिंहभारत२० लाखअनसोल्ड
विष्णू सोलंकीभारत२० लाख अनसोल्ड
अतित शेठभारत२० लाखअनसोल्ड
रिपल पटेलभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स (२० लाख)
शाहरुख खानभारत२० लाखपंजाब किंग्स (५ कोटी २५ लाख)
आयुष बदोनीभारत२० लाखअनसोल्ड
व्यंकटेश अय्यरभारत२० लाख अनसोल्ड
के. गौतमभारत २० लाखचेन्नई सुपरकिंग्स (९ कोटी २५ लाख)
विवेक सिंहभारत२० लाखअनसोल्ड
विष्णू विनोदभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स  (२० लाख)
शेल्डन जॅक्सनभारत२० लाखKKR (२० लाख)
केदार देवधरभारत२० लाखअनसोल्ड
मोहम्मद अझहरुद्दीनभारत२० लाखRCB (२० लाख)
अवि बारोटभारत२० लाखअनसोल्ड
मुस्तफा युसूफभारत२० लाखअनसोल्ड
अंकित राजपूतभारत३० लाखअनसोल्ड
लुकमान हुसेन मेरीवालाभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स (२० लाख)
चेतन सकरियाभारत२० लाखराजस्थान रॉयल्स (१ कोटी २० लाख)
टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनकिंग्स इलेव्हन पंजाब