IPL Auction 2021 : शाहरुख खान खेळणार प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सकडून; २० लाखांहून थेट ५.२५ कोटींची भरारी

IPL Auction 2021 : Shahrukh Khan शाहरुख खान ( Shahrukh Khan) याला प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) संघानं ५.२५ कोटी रुपये मोजले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 18, 2021 05:34 PM2021-02-18T17:34:22+5:302021-02-18T17:41:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2021 : Syed Mushtaq Ali hero Shahrukh Khan joins Preity Zinta’s Punjab Kings for 5.25 cr | IPL Auction 2021 : शाहरुख खान खेळणार प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सकडून; २० लाखांहून थेट ५.२५ कोटींची भरारी

IPL Auction 2021 : शाहरुख खान खेळणार प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सकडून; २० लाखांहून थेट ५.२५ कोटींची भरारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2021 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तामिळनाडूच्या विजयातील नायक शाहरुख खान ( Shahrukh Khan) याला प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) संघानं ५.२५ कोटी रुपये मोजले. २० लाख बेस प्राईज असलेल्या शाहरुख खानसाठी एवढी मोठी रक्कम लागणे अपेक्षित होतेच, त्याला कारण ठरलं ते सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेतील त्याची फटकेबाजी. त्यानं २२० च्या स्ट्राईक रेटनं तुफान फटकेबाजी केली. बॉलिवूड स्टार शाहरुख खान याच्या नावावरूनच या क्रिकेटपटूचं नाव ठेवण्यात आलं असलं तर तो रजनीकांत याचा जबरा फॅन आहे.  तामिळनाडू संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक यानंही शाहरुख खानचं कौतुक केलं होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे.    १.५ कोटी ते थेट १४ कोटी; किंग्स पंजाबनं का मोजली झाय रिचर्डसनसाठी एवढी रक्कम?



२७ मे १९९५मध्ये चेन्नईतील त्याचा जन्म झाला. कमी वयातच त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शालेय स्तरावर तो डॉन बॉस्को आणि सेंट बेड्स या दोन संघांकडून क्रिकेट केळायचा. वयाच्या १३ व्या वर्षी त्यानं तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या लीगमधून पदार्पण केलं. आक्रमक फलंदाजीमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. २०१३/१४च्या विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं पदार्पणातच प्रतिस्पर्धी संघांचे धाबे दणाणून सोडले होते. २०१८/१९च्या रणजी करंडक स्पर्धेत त्यानं तामिळनाडू संघाकडून पदार्पण केलं. चेन्नई सुपर किंग्सनं २०१२मध्ये घेतलेल्या ज्युनियर क्रिकेट स्पर्धेत त्यानं दमदार खेळ केला होता.  

मुस्तफिजुर रेहमान बांगलादेश१ कोटीराजस्थान रॉयल्स (१ कोटी)
जाय रिचर्डसनऑस्ट्रेलिया१.५० कोटीपंजाब किंग्स (१४ कोटी)
नॅथन कुल्टरनाईलऑस्ट्रेलिया१.५० कोटीमुंबई इंडियन्स (५ कोटी)
शेल्डन कॉट्रेलवेस्ट इंडिज१ कोटीअनसोल्ड
उमेश यादवभारत१ कोटीदिल्ली कॅपिटल्स (१ कोटी)
आदिल राशिदइंग्लंड१.५० कोटीअनसोल्ड
राहुल शर्माभारत५० लाखअनसोल्ड
मुजीब उर रहमानअफगाणिस्तान१.५० कोटीअनसोल्ड
हरभजनसिंगभारत२ कोटीअनसोल्ड
इश सोढीन्यूझीलंड५० लाखअनसोल्ड
पियूष चावलाभारत५० लाखमुंबई इंडियन्स (२ कोटी ४० लाख)
कैस अहमदअफगाणिस्तान५० लाखअनसोल्ड
सी. हरी निशांतभारत२० लाखअनसोल्ड
सचिन बेबीभारत२० लाखRCB (२० लाख)
राहुल गहलोतभारत२० लाखअनसोल्ड
रजत पाटीदारभारत२० लाखRCB (२० लाख)
हिम्मत सिंहभारत२० लाखअनसोल्ड
विष्णू सोलंकीभारत२० लाख अनसोल्ड
अतित शेठभारत२० लाखअनसोल्ड
रिपल पटेलभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स (२० लाख)
शाहरुख खानभारत२० लाखपंजाब किंग्स (५ कोटी २५ लाख)
आयुष बदोनीभारत२० लाखअनसोल्ड
व्यंकटेश अय्यरभारत२० लाख अनसोल्ड
के. गौतमभारत २० लाखचेन्नई सुपरकिंग्स (९ कोटी २५ लाख)
विवेक सिंहभारत२० लाखअनसोल्ड
विष्णू विनोदभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स  (२० लाख)
शेल्डन जॅक्सनभारत२० लाखKKR (२० लाख)
केदार देवधरभारत२० लाखअनसोल्ड
मोहम्मद अझहरुद्दीनभारत२० लाखRCB (२० लाख)
अवि बारोटभारत२० लाखअनसोल्ड
मुस्तफा युसूफभारत२० लाखअनसोल्ड
अंकित राजपूतभारत३० लाखअनसोल्ड
लुकमान हुसेन मेरीवालाभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स (२० लाख)
चेतन सकरियाभारत२० लाखराजस्थान रॉयल्स (१ कोटी २० लाख)

Web Title: IPL Auction 2021 : Syed Mushtaq Ali hero Shahrukh Khan joins Preity Zinta’s Punjab Kings for 5.25 cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.