Join us  

IPL Auction 2020 : ऑसींसाठी पाडला पैशांचा पाऊस; जाणून घेऊया कोणत्या देशातील खेळाडूंसाठी मोजली किती रक्कम?

आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 4:31 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव झाला. दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं रेकॉर्ड तोड कमाई केली. त्यानं 15.50 कोटीत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात एन्ट्री मारली. आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली होती. पण, यातील सर्वाधिक रक्कम ही ऑस्ट्रेलियाच्या स्पेशल 13 खेळाडूंसाठी मोजली गेली आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या देशाच्या किती खेळाडूंना काल मालामाल केले...पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. त्यानं 15.50 कोटीत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात एन्ट्री मारली.  त्यानंतर ख्रिस मॉरिस ( 10 कोटी), शेल्डन कोट्रेल ( 8.50 कोटी) आणि नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी) यांनी सर्वाधिक भाव खाल्ला.कालच्या लिलावात भारताच्या 33 खेळाडूंवर यशस्वी बोली लागली. पण,  किमतीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या 13 खेळाडूंनी त्यांच्यावर मात केली. ऑस्ट्रेलियाच्या 13 खेळाडूंसाठी संघमालकांनी एकूण 57.25 कोटी रक्कम मोजली. म्हणजेच 4.40 ( कोटी) इतक्या सरासरीनं ऑसी खेळाडूंवर बोली लागली. त्यानंतर इंग्लंडच्या 7 खेळाडूंसाठी 17.75 कोटी म्हणजेच सरासरी 2.53 ( कोटी) इतकी रक्कम खर्च केली. भारताच्या 33 खेळाडूंवर एकूण 33.30 कोटी रक्कम खर्च झाली. त्यानंतर न्यूझीलंडच्या एका खेळाडूसाठी 50 लाख, दक्षिण आफ्रिकेच्या 3 खेळाडूंसाठी 10.75 लाख, श्रीलंकेच्या 1 खेळाडूसाठी 50 लाख आणि वेस्ट इंडिजच्या 4 खेळाडूंसाठी 17.25 लाख रक्कम खर्च करण्यात आली.यात सर्वाधिक फायदा कुणाचा झाला असेल तर तो विंडीजच्या शेल्डन कोट्रेलचा. 50 लाख मुळ किंमत असलेला हा खेळाडू 8.50 लाख म्हणजेच 17 पट अधिक रक्कम कमवून गेला. त्यानंतर शिमरोन हेटमायर ( 50 लाख मूळ किंमत) 15.5 पट म्हणजे 7.75 कोटी, वरुण चक्रवर्थी ( 30 लाख मूळ किंमत) 13.3 पट म्हणजे 4 कोटी, यशस्वी जैस्वाल ( 20 लाख मूळ किंमत) 12 पट म्हणजे 2.40 कोटी आणि रवी बिश्नोई ( 20 लाख मूळ किंमत) 10 पट म्हणजे 2 कोटी कमावून गेला. 

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020आॅस्ट्रेलियाइंग्लंडश्रीलंकाभारतन्यूझीलंडवेस्ट इंडिज