Join us  

IPL 2021: कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला

IPL 2021: कोरोना महामारीचं वाढतं संकट लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आणि पाकिस्तान प्रमिअर लीग (PSL) स्पर्धा पुढे ढकलण्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानं दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:41 AM

Open in App

IPL 2021: कोरोना महामारीचं वाढतं संकट लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आणि पाकिस्तान प्रमिअर लीग (PSL) स्पर्धा पुढे ढकलण्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानं दिला आहे. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या यंदाच्या सीझनला सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण २० सामने देखील झाले आहेत. पण देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयोजकांनी स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत विचार करायला हवा असं मत 'रावळपिंडी एक्स्प्रेस' शोएब अख्तरनं व्यक्त केलं आहे. (IPL, PSL should be postponed amidst the COVID-19 pandemic: Shoaib Akhtar)

IPL 2021: सर जडेजाच्या तुफान बॅटिंगनं धोनीच्या पत्नीचे डोळे दिपले, म्हणाली...

पाकिस्तान प्रिमिअर लीग (PSL) फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. पण संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर म्हणजेच १ जूनपासून पाकिस्तान प्रमिअर लीग पुन्हा सुरू होणार आहे. 

IPL 2021: 'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात, आयपीएल सोडतोय', आर.अश्विनची स्पर्धेतून माघार

क्रिकेटपेक्षा नागरिकांचे जीव वाचणं महत्वाचं असून क्रिकेट स्पर्धांवर खर्च होणारा पैसा कोरोना संकटासाठी वापरण्यात आला तर मोठी मदत होईल आणि परिस्थिती बदलता येईल, असं मत शोएब अख्तरनं मांडलं आहे. 

डेव्हिड वॉर्नरची शॉर्ट धाव महागात पडली, दिल्ली कॅपिटल्सनं सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकली

"भारत सध्या कोरोनाच्या भयानक संकटाला सामोरा जात आहे. कठोर नियमांचं पालन करणं जर जमत नसेल तर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार करायला हवा. पाकिस्तानची प्रिमिअर लीग पुढे ढकलण्यात आलीय त्यामुळे मी आयपीएलही पुढे ढकला अशा अर्थानं बोलत नाहीय. पीएसएल स्पर्धा देखील जून महिन्यात घेऊ नये तीही आणखी पुढे ढकलावी", असं शोएब अख्तर म्हणाला. 

होय, एकट्या रवींद्र जडेजानं आम्हाला पराभूत केलं; CSKच्या खेळाडूचं विराट कोहलीकडून कौतुक

"आयपीएल स्पर्धा महत्वाची नाही आणि त्यावर खर्च होणारा पैसा ऑक्सिजन टँक खरेदी करण्यासाठी वापरता येईल. त्यामुळे अनेकांचे जीव वाचतील. सध्या आपल्याला क्रिकेटचे हिरो किंवा मनोरंजनाची गरज नाहीय. सध्या आपल्याला भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचे जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. रोज मृत्यूंचे आकडे वाढताहेत म्हणून मी हे कठोर विधान करतोय", असं रोखठोक विधान शोएब अख्तरनं केलं आहे. 

पाकिस्तान आता भयानक संकटाशी सामना करतोय. संपूर्ण देशात आता फक्त १० टक्के ऑक्सिजन उरला आहे आणि नागरिकांकडून निर्बंधांचं पालन केलं जात नाहीय. त्यामुळे सरकारनं कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे, असंही अख्तरनं म्हटलं आहे. सध्या ईदच्या शॉपिंगची कोणतीही गरज नाही, घरी राहा आणि कुटुंबाची काळजी घ्या, असं आवाहनही त्यानं केलं आहे.  

टॅग्स :शोएब अख्तरआयपीएल २०२१पाकिस्तानकोरोना वायरस बातम्या