IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरची शॉर्ट धाव महागात पडली, दिल्ली कॅपिटल्सनं सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकली

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाची गाडी रुळावर आली असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) त्यांना धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:45 PM2021-04-25T23:45:28+5:302021-04-25T23:50:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: DC Vs SRH T20 Live: David Warner's short run costly, DelhiCapitals beat SRH in the Super over | IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरची शॉर्ट धाव महागात पडली, दिल्ली कॅपिटल्सनं सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकली

IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरची शॉर्ट धाव महागात पडली, दिल्ली कॅपिटल्सनं सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाची गाडी रुळावर आली असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) त्यांना धक्का दिला. पुन्हा एकदा SRHच्या फलंदाजांना नाराज केलं. केन विलियम्सन एकटी खिंड लढवली, परंतु दुसऱ्या बाजूनं SRHचे एकेक फलंदाज तंबूत परतत होते. डेव्हिड वॉर्नर, केदार जाधव यांनी आपापल्या विकेट्स फेकल्या. पण, केन अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.  सनरायझर्स हैदराबादला ७ बाद १५९ धावा करता आल्या. दिल्लीनं ४ बाद १५९ धावा केल्या होत्या...

सुपर ओव्हरचा थरार

  • केन विलियम्सन व डेव्हिड वॉर्नर हैदराबादकडून मैदानावर उतरले. अक्षर पटेलनं दिल्लीसाठी ते षटक फेकले. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली अन् केननं दुसरा चेंडू चौकार खेचला. हैदराबादला त्या षटकात ८ धावा करता आल्या. पण, वॉर्नरनं एक धाव शॉर्ट धावल्यानं SRHला ७ धावांवर समाधान मानावे लागले.  

  • राशिद खानला गोलंदाजीला आणल्याचं पाहताच दिल्लीनं रिषभ पंत व शिखर धवन ही डावखुरी जोडी मैदानावर उतरवली. रिषभ पंतनं पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर रिषभनं तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारून चौकार खेचला. राशिदनं पुढील दोन चेंडू निर्धाव फेकली अन् पाचव्या चेंडूवर रिषभसाठी LBWची अपील झाली. पण, SRHचा DRS वाया गेला. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत दिल्लीनं विजय पक्का केला. 

मर्यादित २०-२० षटकांत काय झालं? 
दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावा जोडताना सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची धुलाई केली. पृथ्वीला ३९ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५३ धावांवर बाद झाला.  रिषभनं २७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३७ धावा केल्या. त्याच षटकात निकोलस पूरन ( १) माघारी परतला. स्मिथ  २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं ४ बाद १५९ धावा केल्या. DC Vs SRH IPL Matches, DC Vs SRH IPL match 2021

प्रत्युत्तरात जॉनी बेअरस्टोनं फटकेबाजी करून चांगली सुरुवात करून दिली. बेअरस्टो १८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ३८ धावा करून माघारी परतला. विराट  सिंग ( ४) व केदार जाधव ( ९) अपयशी ठरले. केन ५१ चेंडूंत ८ चौकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. १ चेंडूंत २ धावांची गरज असताना सुचिथ स्ट्राईकवर होता. अन् त्याला एकच धाव काढता आली सामना सुपर ओव्हरमध्ये रंगला. सनरायझर्स हैदराबादला ७ बाद १५९ धावा करता आल्या. DC Vs SRH Live Score, IPL 2021 DC Vs SRH, DC Vs SRH Live Match
 

Web Title: IPL 2021: DC Vs SRH T20 Live: David Warner's short run costly, DelhiCapitals beat SRH in the Super over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.