आयपीएल २०२६ च्या हंगामाआधी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मोठी डील होणार असल्याची गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ट्रेडच्या माध्यातून संजू सॅमसन चेन्नईत तर रवींद्र जडेजा राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील स्टार युवा बॅटर यशस्वी जैस्वालनं जड्डूसोबतची सेल्फी शेअर करत ही डील पक्की झाल्याची जणू हिंटच दिली आहे. एवढेच नाही तर रवींद्र जडेजाच्या कॅप्टन्सीत खेळण्यातही तयार असल्याचे चित्रही यात स्पष्ट होते. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी कॅप्टन्सीच्या शर्यतीतून 'आउट', पण...
संजू सॅमसन चेन्नईच्या ताफ्यात गेल्यावर त्याच्या जागी संघात येणारा रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होईल, अशी चर्चाही रंगू लागली आहे. त्यामुळे रियान परागसह यशस्वी जैस्वाल कॅप्टन्सीच्या शर्यतीतून आउट होईल. यशस्वी जैस्वालसह रवींद्र जडेजा सध्या भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग आहेत. या सामन्याआधी यशस्वीनं इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रवींद्र जडेजासोबतचा खास सेल्फी शेअर केला आहे. यात दोघांच्यात कमालीचे बॉन्डिंग पाहायला मिळते. त्यामुळे जड्डू कर्णधार झाला तर यशस्वीच्या पदरी नाराजीचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे संकेतही या फोटोतून मिळतात.
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
राजस्थान रॉयल्स आजमावणार मुंबई इंडियन्सचा 'हार्दिक' पॅटर्न?
मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्रेडच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेतल्यावर त्याच्याकडे संघाचे नेतृत्व दिल्याचे पाहायला मिळाले होते. अगदी हाच पॅटर्न राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात पाहायला मिळू शकतो. जडेजानं IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचेही नेतृत्व केले आहे. पण त्याला कॅप्टन्सीत काही कमाल दाखवता आली नव्हती. परिणामी काही सामन्यानंतर त्याने नेतृत्व पुन्हा MS धोनीकडे सोपवल्याचेही पाहायला मिळाले होते. २००८ मध्ये ज्या संघाकडून पदार्पण केले त्या संघाकडून तो कॅप्टन्सीसह नवी इनिंग सुरुवात करुन खास छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल.