IPL 2026 Who is Praful Hinge IPL debut for SRH vs PBKS : न्यू चंडीगडच्या मुल्लानपूर स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलमधील १७ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबचा 'सरपंच साब' श्रेयस अय्यरनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूला ईशान किशन याने दोन बदलासह मैदानात उतरणार असल्याचे सांगत प्रफुल हिंगे याला पदार्पणाची संधी देणार असल्याचे सांगितले. इथं जाणून घेऊया कोण विदर्भकर पठ्ठ्या? ज्याला पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून मोठी संधी...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला, तरी पदार्पण निश्चित
नाणेफेकीनंतर ईशान किशन याने दोन बदलासह मैदानात उतरल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला की, सलील अरोरा याला लायम लिविंगस्टोनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवत आहोत. इम्पॅक्टफुल प्लेयरच्या यादीतील प्रफुल हिंगे हा जयदेव उनाडकटच्या जागी पदार्पणाचा सामना खेळणार आहे, असेही त्याने सांगितले.
कोण आहे Praful Hinge? सनरायझर्सकडून पंजाबविरुद्ध मिळाली पदार्पणाची संधी
प्रफुल हिंगे याचा जन्म १८ जानेवारी २००२ मध्ये नागपूर येथे झाला. २४ वर्षीय उजव्या हाताचा गोलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. १० प्रथम श्रेणी सामन्यात ३० विकेट्स घेत त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध केली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामाआधी झालेल्या मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ३० लाख या मूळ किंमतीसह त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन
ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक/कर्णधार), हेन्री क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, एशान मलिंगा
- सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर: जयदेव उनाडकट, लायम लिविंगस्टोन, शिवम मावी, प्रफुल्ल हिंगे, कामिंदू मेंडिस
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कॉनॉली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
- पंजाब किंग्स इम्पॅक्ट प्लेयर : नेहल वढेरा, विष्णू विनोद, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार