IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!

Virat Kohli Naagin Dance Video: आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने भर मैदानात नागिन डान्स केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 18:16 IST2026-04-11T18:15:03+5:302026-04-11T18:16:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Virat Kohli Hilarious Naagin Dance Goes Viral; RCB Players Left in Splits | IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!

IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!

गुवाहाटी: आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगलेल्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी विराट कोहलीच्या एका आगळ्यावेगळ्या अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी सरावाच्या वेळी विराट कोहलीने चक्क नागिन डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर १० एप्रिल रोजी हा सामना पार पडला. सामना सुरू होण्यापूर्वी जेव्हा आरसीबीचा संघ मैदानावर सराव करत होता, तेव्हा विराट कोहली अतिशय आनंदी आणि मजेशीर मूडमध्ये दिसला. वॉर्मअप सुरू असताना अचानक विराटने नागिन डान्सच्या स्टेप्स करायला सुरुवात केली. विराटचा डान्स पाहून आरसीबीच्या खेळाडूंसह स्टँड्समध्ये बसलेले चाहते हसून लोटपोट झाले. मैदानावर नेहमी आक्रमक दिसणारा विराट अशा प्रकारे मस्करीत रमलेला पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

सोशल मीडियावर विराटच्या या नागिन डान्सच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काहींनी विराट हा खरा मनोरंजन करणारा खेळाडू आहे असे म्हटले आहे. तर, काहींनी मैदानावर इतका दबाव असूनही विराटचा हा कूल अंदाज भारी आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राजस्थानविरुद्ध आरसीबीचा पराभव

या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०१ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक ६३ धावा केल्या. तर, विराटने १६ चेंडूंत ३२ धावांची वेगवान खेळी केली. मात्र, राजस्थानच्या फलंदाजांनी हे लक्ष्य अगदी सहज पार केले. १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (७८ धावा) आणि ध्रुव जुरेल (नाबाद ८१  धावा) यांच्या स्फोटक फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने १८ व्या षटकातच विजय मिळवला. महत्त्वाचे म्हणजे, सामना गमावल्यानंतरही विराट कोहलीने दाखवलेली खिलाडूवृत्ती चर्चेचा विषय ठरली. त्याने सामना संपल्यावर राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीची भेट घेतली आणि त्याच्या कॅपवर स्वाक्षरी करून त्याचे कौतुक केले.

Web Title : IPL 2026: हार के बावजूद विराट कोहली का 'नागिन डांस' छाया रहा

Web Summary : राजस्थान रॉयल्स से आरसीबी की हार के बावजूद, विराट कोहली का अभ्यास के दौरान 'नागिन डांस' वायरल हो गया, जिससे प्रशंसक खुश हुए। राजस्थान जीता, पर कोहली की खेल भावना सराही गई.

Web Title : IPL 2026: Virat Kohli's 'Nagin Dance' Steals the Show Despite Loss

Web Summary : Despite RCB's loss to Rajasthan Royals, Virat Kohli's 'Nagin Dance' during practice went viral, delighting fans. Rajasthan won, but Kohli's sportsmanship, especially praising young Vaibhav Suryavanshi, was also highlighted.