Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Trade Deals :अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत

अर्जुन तेंडुलकर LSG संघात जाणार अन् शार्दुल ठाकूरची MI मध्ये एन्ट्री होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 21:02 IST

Open in App

IPL 2026 MI Trade Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील २०२६ च्या हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावाआधी खेळाडूंना रिटेन-रिलीज करण्याच्या रणनितीसह फ्रँचायझी संघामध्ये ट्रेड डीलचा मुद्दा चर्चेत आहे. संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील स्वॅप डीलची चर्चा रंगत असताना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये खास डीलची चर्चा रंगते आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अर्जुन तेंडुलकर LSG संघात जाणार अन् शार्दुल ठाकूरची MI मध्ये एन्ट्री होणार?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ट्रेडच्या माध्यमातून लखनौच्या ताफ्यात एन्ट्री मारण्याची शक्यता आहे. याशिवाय गत हंगामात अनसोल्ड राहून रिप्लेसमेंटच्या रुपात LSG संघाकडून खेळताना दिसलेला शार्दुल ठाकूरमुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून एन्ट्री मारणार असल्याची चर्चा आहे. MI आणि LSG संघात दोन्ही खेळाडूंसंदर्भातील डीलची चर्चा झाली असून थेट खेळाडूंची अदलाबदली न करता ऑल कॅश ट्रान्सफरच्या माध्यमातून दोन्ही फ्रँचायझी हा डाव खेळणार असल्याचेही समजते. 

IPL 2026 Auction : ठरलं! IPL च्या लिलावासंदर्भात सलग तिसऱ्यांदा असं घडणार; जाणून घ्या सविस्तर

बीसीसीआयकडून केली जाते यासंदर्भातील अधिकृत घोषणा

क्रिकबझच्या वृत्तानुसार, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शार्दुल ठाकूर आणि अर्जुन तेंडुलकर यांना ट्रेड करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. आयपीएल नियमानुसार, फ्रँचायझी संघांतील खेळाडू  बदलासंदर्भात अधिकृत घोषणा ही बीसीसीआयकडून केली जाते. १५ नोव्हेंबरला खेळाडू रिटेन रिलीज यादी जाहीर करण्याची अखेरची तारीख आहे. ही यादी समोर आल्यावर मिनी लिलावाआधी कोणत्या फ्रँचायझी संघाने ट्रेड विंडोच्या माध्यमातून कोणत्या खेळाडूवर खेळलेला डाव यशस्वी ठरला ते स्पष्ट होईल.

अनसोल्ड शार्दुल ठाकूरची रिप्लेसमेंटच्या रुपात झाली होती LSG संघात एन्ट्री

आयपीएलच्या गत हंगामासाठी झालेल्या लिलावात शार्दुल ठाकूर अनसोल्ड राहिला होता. LSG च्या ताफ्यातील मोहसिन खान दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्यावर शार्दुल ठाकूरची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. LSG च्या संघाने २ कोटी या मूळ किंमतीसह त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. १० सामन्यात १३ विकेट्स घेऊन त्याने गोलंदाजीत आपली छापही सोडली होती. 

अर्जुन तेंडुलकरला MI मध्ये संधी मिळेना, आता....

अर्जुन तेंडुलकर २०२१ च्या हंगामापासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. दोन हंगाम बाकावर बसून काढल्यावर २०२३ च्या हंगामात त्याला मुंबई इंडियन्सकडून IPL मध्ये पदार्पणाचा सामना खेळण्याची संधी मिळाली. या हंगामात तो फक्त ३ सामनेच खेळला. २०२४ च्या हंगामात त्याला फक्त एका सामन्यात संधी मिळाली. आतापर्यंत ५ आयपीएल सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून गोवा संघातून खेळण्याचा निर्णय घेतल्यावर आता नव्या रंगात, नव्या संघातून अर्जुन तेंडुलकर मैदान गाजवेल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Arjun Tendulkar may exit Mumbai Indians in trade deal.

Web Summary : Arjun Tendulkar may join Lucknow Super Giants in a trade, with Shardul Thakur possibly moving to Mumbai Indians. Discussions involve an all-cash transfer. Official announcement from BCCI is awaited after retention list is out.
टॅग्स :आयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकरलखनौ सुपर जायंट्सशार्दुल ठाकूरसचिन तेंडुलकर