Shreyas Iyer Fined PBKS vs CSK IPL 2026: मध्ये पंजाब किंग्सने विजयाचा धडाका लावला असला, तरी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी चिंतेची बाब समोर आली आहे. पंजाब किंग्सने सलग दोन विजय मिळवून गुणतालिकेत आपली पकड मजबूत केली असली, तरी मैदानावरील वेळेचे व्यवस्थापन करण्यात कर्णधार अपयशी ठरताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (CSK) रोमहर्षक विजयानंतर, षटकांची गती कमी राखल्यामुळे (Slow Over Rate) बीसीसीआयने अय्यरवर २४ लाखांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडून या हंगामात सलग दुसऱ्यांदा ही चूक झाल्याने कर्णधारासह संपूर्ण संघाला याचा फटका बसला आहे.
काय आहे प्रकरण?
शुक्रवारी ३ एप्रिल रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात पंजाबने २१० धावांचे मोठे आव्हान यशस्वीपणे पार करत विजय मिळवला. मात्र, गोलंदाजी करताना पंजाबने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (Code of Conduct) हे 'ओव्हर रेट' नियमाचे उल्लंघन मानले जाते. श्रेयस अय्यरने या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्धही हीच चूक केली होती. तेव्हा त्याला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. आयपीएलच्या नियमांनुसार, एकाच हंगामात दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाते. त्यामुळे आता अय्यरला २४ लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे.
संघालाही बसला फटका
नियमानुसार, सलग दुसऱ्यांदा चूक झाल्यास केवळ कर्णधारावरच नाही, तर प्लेइंग इलेव्हनमधील इतर खेळाडूंवरही दंड आकारला जातो. त्यानुसार प्रत्येक खेळाडूला त्यांच्या मॅच फीच्या २५ टक्के किंवा ६ लाख रुपये (जे कमी असेल ते) दंड म्हणून भरावे लागणार आहेत.
बंदीची टांगती तलवार
तिसऱ्यांदा अशीच चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई देखील होऊ शकते, ज्यामुळे पंजाबच्या पुढील मोहिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Shreyas Iyer fined again for slow over rate in IPL 2026. Second offense brings heavy penalty, team fined. A third violation could lead to a ban.
Web Summary : आईपीएल 2026 में धीमी ओवर गति के लिए श्रेयस अय्यर पर फिर जुर्माना। दूसरी बार गलती करने पर भारी जुर्माना, टीम पर भी जुर्माना। तीसरी बार उल्लंघन पर प्रतिबंध लग सकता है।