राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील हुकमी एक्का असलेला संजू सॅमसन फ्रँचायझी संघाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. आगामी हंगामाआधी मला मोकळे करा अर्थात रिलीज करा, अशी विनंती संजू सॅमसन याने RR फ्रँचायझी संघाकडे केल्याचा दावा अनेक वृत्तांमधून करण्यात आला आहे. त्यात आता यामागचं कारण काय ते समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीमुळे स्टार बॅटरवर संघ सोडण्याची वेळ
माजी क्रिकेटर आणि विद्यमान समोलचक अन् क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा यांनी यामागचं कारण सांगितले आहे. आकाश 'वाणी'चे बोल अनेकांना चक्रावून सोडतील असे आहे. कारण वैभव सूर्यवंशीमुळे स्टार बॅटरला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे ते म्हणाले आहेत. नेमकी ही भानगड काय? असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पडू शकतो. इथं जाणून घेऊयात आकाश चोप्रा यांनी कोणत्या लॉजिकवर हे मत मांडलंय त्यासंदर्भात सविस्तर
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
बटलरला बाहेर काढलं, पण आता १४ वर्षांच्या पोरानं चॅलेंज निर्माण केलं
आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्युब चॅनेलवरील खास शोमध्ये म्हटलंय की, "संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सची साथ का सोडायचीये? यामागचं कारण रंजक आहे. गत हंगामाच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सच्या संघाने जोस बटलरला रिलीज केले होते. यात संजूचा हात होता, असे मला वाटते. कारण यशस्वी जैस्वालसोबत संजू सॅमसनला डावाची सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता वैभव सूर्यवंशी हा युवा बॅटर संजूच्या वाटेतील अडथळा ठरत आहे. तो संघात असताना संजू सॅमसनला डावाची सुरुवात करता येणार नाही. कदाचित त्यामुळेच संजू आता दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळण्याचा विचार करत असावा, " अशा आशयाचे वक्तव्य आकाश चोप्रा यांनी केलं आहे.
संजूसह RR फ्रँचायझीचं मौन
संजू सॅमसन २०१३ ते २०१५ या कालावधीत राजस्थान रॉयल्सकडून खेळल्यावर दोन हंगामात तो दिल्ली डेअरडेविल्स (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळताना पाहायला मिळाले. २०१८ मध्ये तो पुन्हा राजस्थानच्या ताफ्यात सामील झाला. २०२२ च्या हंगामात त्याने या संघाला फायनलपर्यंत नेले. पण आता तो पुन्हा एकदा संघाची साथ सोडून दुसऱ्या फ्रँचायझी संघाटी वाट धरणार आहे, अशी चर्चा रंगू लागलीये. संजू किंवा राजस्थान रॉयल्सच्या संघाने अद्याप यावर अधिकृतरित्या कोणतेही भाष्य केलेले नाही.