Vaibhav Suryavanshi IPL 2026 : गत हंगामात आयपीएलमध्ये धमाकेदार पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी दुसऱ्या वर्षी अधिक बिनधास्त अंदाजात IPL रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं RR च्या डावाला सातत्याने दमदार सुरुवात करून देताना दिसतोय. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने छोटी पण इम्पॅक्टफुल खेळी केली. यादरम्यान आता हा युवा बॅटर पुढच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसेल, अशी चर्चा रंगू लागली आहे. भारताच्या माजी क्रिकेटरनं यासंदर्भात भविष्यवाणी केली आहे. इथं जाणून घेऊयात IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशी MI कडून खेळणार असल्याची चर्चा रंगण्यामागचे कारण...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'ती' पोस्ट अन् वंडर बॉय वैभव सूर्यंवशी MI कडून खेळणार असल्याची चर्चा
भारताचा माजी क्रिकेटर जतिन परांजपे याने एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये वैभव सूर्यवंशी पुढच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना दिसेल, अशी भविष्यवाणी केली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याआधी जतिन परांजपे यांने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "वैभव सूर्यवंशी आज रात्री आपल्या भविष्यातील टीम विरुद्ध खेळताना दिसेल!" ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
मुंबई इंडियन्स म्हणजे टीम इंडियासाठी प्रतिभावंत खेळाडू घडवणारी 'तालीम'
IPL मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या तालमीत शड्डू ठोकणारे अनेक खेळाडू टीम इंडियाचे प्रतीनिधीत्व करताना दिसले आहेत. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यासारखे अनेक खेळाडू MI मधील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात एन्ट्री मारली आहे. त्यामुळेच अनेक क्रिकेट तज्ज्ञ वैभव सूर्यवंशीसाठी मुंबई इंडियन्सचा संघ टीम इंडियाचे दरवाजे उघडण्यासाठी उत्तम ठरेल, असे मानत आहेत. खरंतर सध्याची घडीला वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहता तो कोणत्याही संघाकडून खेळला तरी लवकरच तो टीम इंडियात दिसेल असे चित्र निर्माण झाले आहे. कदाचित यंदाच्या हंगामाआधीच तो टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो. IPL मध्ये अनेकदा ट्विस्ट पाहायला मिळतो. खेळाडूंची मेगा डील चर्चेचा विषय ठरते. त्यात MI चा संघ पॉवरफुल डाव खेळण्यात माहिर आहे. त्यामुळे ते आगामी हंगामात खरंच वैभव सूर्यवंशीला आपल्या ताफ्यातून खेळवण्यासाठी फिल्डिंग लावणार का? ते पाहणे नक्कीच रंजक असेल.