आयपीएल २०२६ च्या हंगामात पुन्हा एकदा आपल्या जुन्या संघाकडून खेळताना रविंद्र जडेजा प्रत्येक सामन्यात नव्या सेलिब्रेशनसह लक्षवेधून घेताना दिसत आहे. फलंदाजी करताना 'तलवारबाजी'सह मैफील लुटणारा जड्डूने यंदाच्या हंगामात विकेट मिळवल्यावर 'बंदुकधारी' झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील अष्टपैलूनं 'पॉकेट सेलिब्रेशन'सह जोस बटलरला तंबूचा रस्ता दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"तुझी विकेट आता माझ्या खिशात"; जड्डूचं सेलिब्रेशन चर्चेत
गुजरात टायटन्सच्या डावातील १४ व्या षटकात रविंद्र जडेजाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जोस बटलरची शिकार करत संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. ऑफ स्टंपबाहेर टाकलेल्या फुल लेंथ चेंडूवर बटलरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण सीमारेषेजवळ डेव्हॉन फरेराने त्याचा झेल टिपला. विकेट घेतल्यानंतर जडेजाने बटलरकडे पाहून ‘तुझी विकेट आता माझ्या खिशात’ अशी अंदाजात हातवारे करत भन्नाट सेलिब्रेशन केले.
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
गिल- साई सुदर्शनचा अर्धशतकी धमाका
गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन जोडीनं शतकी भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. गिलने ४४ चेंडूत ८४ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे साई सुदर्शनने ३६ चेंडूत ५५ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी सलामीसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. शेवटच्या षटकांत वॉशिंग्टन सुंदरने २० चेंडूत नाबाद ३७ धावा करत संघाची धावसंख्या २० षटकांत ४ बाद २२९ पर्यंत पोहोचवली.
४ षटकांत ३४ धावा अन् बटलरची विकेट
राजस्थानकडून वेगवान गोलंदाज ब्रिजेश शर्मा याने २ विकेट घेतल्या, तर यशराज पुंजा आणि जडेजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली. रविंद्र जडेजा आपल्या कोट्यातील ४ षटकांत ३४ धावा करत जोस बटलरच्या रुपात मोठी विकेट आपल्या खात्यात जमा केली.
Web Summary : Ravindra Jadeja celebrated Jos Buttler's wicket with a unique 'pocket celebration' during the RR vs GT match. Gill and Sai Sudarshan's partnership powered GT to a strong total, while Jadeja's crucial wicket helped restrict RR.
Web Summary : आरआर बनाम जीटी मैच में रविंद्र जडेजा ने जोस बटलर का विकेट लेकर अनोखे 'पॉकेट सेलिब्रेशन' मनाया। गिल और साई सुदर्शन की साझेदारी ने जीटी को मजबूत स्कोर तक पहुंचाया, जबकि जडेजा का महत्वपूर्ण विकेट आरआर को रोकने में मददगार रहा।