Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Points Table: गत चॅम्पियन RCB नंबर वन! MI टॉप ५ मधून आउट! CSK सह ३ संघांची पाटी अजूनही कोरी

RCB अन् RR यांच्यात तगडी फाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:05 IST

Open in App

IPL 2026 Points Table After RCB Beat CSK : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील रविवारी झालेल्या डबल हेडरच्या लढतीनंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. गत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने सलग दुसऱ्या विजयासह ४ गुण आपल्या खात्यात जमा करत राजस्थान रॉयल्सला मागे टाकत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सच्या संघ पराभवाच्या हॅट्रिकसह गुणतालिकेत तळाला आहे. इथं एक नजर टाकुयात IPL च्या यंदाच्या हंगामात कोणता संघ कितव्या स्थानी आहे त्यासंदर्भातील सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

RCB अन् RR यांच्यात तगडी फाईट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ २ सामन्यातील २ विजयासह ४ गुण खात्यावर जमा करत उत्तम धावगतीसह (+२.५०१)  अव्वलस्थानावर आहे. त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्स संघाचा नंबर लागतो. रियान परागच्या नेतृत्वाखालील संघाने सलग दोन विजयासह ४ गुण कमावले आहेत. त्यांची निव्वळ धावगती +२.२३३ अशी आहे. या दोन संघांशिवाय दिल्ली कॅपिटल्स (नेट रनरेट +१.१७०) आणि पंजाब किंग्स (नेटरन +०.६३७) यांनीही सलग दोन विजय मिळले असून  हे दोन्ही संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी

MI आघाडीच्या पाचमधून आउट; CSK ची अवस्था अतिशय बिकट

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामात १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजयी सलामी दिली. पण दुसऱ्या पराभवामुळे संघावर आघाडीच्या पाचमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे MI च्या बरोबरीनं सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ तर गत वर्षीप्रमाणेच तळाला आहे. 

CSK सह तीन संघांची पाटी कोरी

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ३ पैकी १ विजय आणि २ पराभवासह गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्यांच्यापेक्षा एक सामना कमी खेळून २ गुण कमावले आहेत पण उत्तम रनरेटच्या जोरावर SRH नं आघाडीच्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. लखनौचा संघ २ पैकी एका विजयासह सातव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाई रायडर्स यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून त्यांची पाटीही कोरी आहे. CSK ला ३ सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यामुळे ते तळाला आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: RCB tops points table, MI out of top 5.

Web Summary : RCB leads the IPL 2026 points table after consecutive wins. MI is out of the top 5, while CSK and two other teams are yet to score.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्सपंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स