Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा

पंजाब किंग्सच्या संघाने दोनशे पारची लढाई सर्वाधिक वेळा जिंकण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 19:16 IST

Open in App

IPL 2026 PBKS vs SRH Punjab Kings Won By 6 Wkts Against Sunrisers Hyderabad : प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्या सुपर हिट शोनंतर 'सरपंच साब' श्रेयस अय्यरच्या कडक अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने न्यू चंडीगडच्या मुल्लानपूर स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेडच्या तुफान फटकेबाजीशिवाय क्लासेनच्या क्लास फलंदाजीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद २१९ धावा करत पंजाबसमोर २२० धावांचे टार्गेट  सेट केले होते. या धावांचा यशस्वी पाठलाग करत पंजाब किंग्सच्या संघाने दोनशे पारची लढाई सर्वाधिक वेळा जिंकण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम केला. पंजाब किंग्सच्या संघाने १० व्यांदा २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

प्रियांश-प्रभसिमरन यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यरचे नाबाद अर्धशतकसनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या २२० धावांचा पाठलाग करताना प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीनं पंजाबच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. प्रियांशने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २० चेंडूत ५७ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला प्रभसिमरन सिंग याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची दमदार खेळी साकारली. या दोघांनाही शिवांग कुमारनं तंबूचा रस्ता दाखवला. कूपर कॉलॉनी अवघ्या ११ धावा करून परतल्यावर श्रेयस अय्यरनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६९ धावा करत संघाचा तिसरा विजय निश्चित केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Punjab Kings triumph over Sunrisers Hyderabad with explosive batting.

Web Summary : Punjab Kings defeated Sunrisers Hyderabad, chasing down 220 thanks to Prabhsimran Singh, Priyansh Arya, and Shreyas Iyer's powerful hitting. Hyderabad set the target with Sharma, Head, and Klassen's contributions. Punjab now holds the record for most 200+ run chases in IPL.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबादश्रेयस अय्यरइशान किशन