IPL 2026 PBKS vs SRH Priyansh Arya Record 2nd Fastest Fifty For Punjab Kings : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्य याने वादळी अर्धशतकासह खास विक्रमाला गवसणी घातली. अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने यंदाच्या हंगामात दुसरे जलद अर्धशतक झळकावले. याआधी वैभव सूर्यवंशीनं १५ चेंडूत दोन अर्धशतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. या खेळीसह पंजाबच्या संघाकडून सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचताना त्याने बिग हिटर निकोलस पूरनचा विक्रमही मोडीत काढला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रियांश आर्यचे विक्रमी अर्धशतक; निकोलस पूरनचा विक्रम मोडला
प्रियांश आर्य याने पंजाब किंग्सच्या संघाकडून दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. या यादीत लोकेश राहुल अव्वलस्थानी आहे. २०१८ च्या हंगामात केएल राहुलनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मोहालीच्या मैदानात फक्त १४ चेंडूत अर्धशतक साजरे केले होते. त्यापाठोपाठ आता प्रियांश आर्य पंजाबकडून जलद अर्धशतक झळकवणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने निकोलस पूरनचा विक्रम मोडला. पूरन याने २०२० च्या हंगामता पंजाबच्या संघाकडून खेळताना दुबईच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक साजरे केले होते. चौथ्या क्रमांकावर प्रभसिमरनचे नाव दिसते. त्याने २०२४ च्या हंगामात कोलकाताच्या मैदानात केकेआरविरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
२८५ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या २२० धावांचा पाठलाग करताना प्रियांश आर्यनं प्रभसिमरनच्या साथीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. शिवांग कुमार याने प्रियांशच्या स्फोटक खेळीला ब्रेक लावला. त्याने २० चेंडूत २८५ च्या स्ट्राईक रेटसह ५ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ५७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय प्रभसिरमन याने २५ चेंडूत ४ चौकारांसह ४ षटकारांच्या मदतीने २०४ च्या स्ट्राईक रेटनं ५१ धावा कुटल्या.