मुंबई इडियन्सच्या संघासाठी यंदाचा हंगाम खूपच वाईट राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यातील पराभवासह त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट झाल्यावर नियमित कर्णधार हार्दिक पांड्याच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुखापतीमुळे मागील दोन सामन्याला मुकल्यावर तो नेट्समध्ये सराव करताना दिसला. पण तरीही मुंबई इंडियन्सच्या संघात त्याला स्थान मिळणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. MI च्या ताफ्यातील कॉर्बिन बॉशच्या वक्तव्यामुळे पुन्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली MI चा संघ मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्दिक पांड्यासंदर्भात नेमकं काय म्हणाला कॉर्बिन बॉश?
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कॉर्बिन बॉश याने हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्ससाठी मोठे आव्हान निर्माण झाल्याची गोष्ट बोलून दाखवली. तो म्हणाला की, " हार्दिक पांड्याशिवाय मैदानात उतरणे नक्कीच कठीण आहे. हार्दिक फक्त कर्णधार नाही, तर तो एक उत्कृष्ट क्रिकेटरही आहे. मैदानावर त्याची उणीव आम्हाला जाणवते. संघाच्या रणनितीसंदर्भात निर्णय घेणारी मंडळी संघासाठी आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम काय आहे, हेच पाहत आहेत."
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
सराव करताना दिसला तरी संघात मिळणार नाही जागा, कारण...
रविवारी रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यातील पराभवासह मुंबई इंडियन्सच्या स्पर्धेतील उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्यासह दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार संघाबाहेर होता. पाठीच्या दुखापतीतू सावरून त्याने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्याआधी सराव केल्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आले. पण कॉर्बिन बॉशच्या वक्तव्यामुळे MI ला त्याच्या फिटनेसवर अजूनही शंका असल्याचे दिसते. त्यामुळेच कर्णधाराच्या खेळण्यावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना त्यात नव्या गोष्टींची भर
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळच्या मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशजनक राहिली. यंदाच्या हंगामात पुन्हा MI अडखळल्यावर पुन्हा एकदा त्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बिनसल्याची चर्चा रंगली. त्यामुळे पुढच्या हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या संघासोबत दिसणार नाही, अशा उलट सुलट चर्चा रंगल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे पंजाब किंग्सविरुद्ध या सगळ्या चर्चेला पूर्णविराम लागणार की, हा मुद्दा असाच गाजत राहणार? ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : Mumbai Indians' poor season raises questions about Hardik Pandya's future. Despite practicing, doubts linger about his fitness, fueled by Corbin Bosch's comments. Suryakumar Yadav might lead again amidst captaincy concerns and speculation about Pandya's future with MI.
Web Summary : मुंबई इंडियंस के खराब प्रदर्शन के कारण हार्दिक पांड्या के भविष्य पर सवाल उठ रहे हैं। अभ्यास के बावजूद, कोर्बिन बॉश की टिप्पणियों के कारण उनकी फिटनेस पर संदेह बना हुआ है। कप्तानी की चिंताओं और पांड्या के एमआई के साथ भविष्य के बारे में अटकलों के बीच सूर्यकुमार यादव फिर से नेतृत्व कर सकते हैं।