Cooper Connolly कोण आहे? PBKS च्या नव्या हिरोनं पदार्पणातच एकहाती लढवला किल्ला

इथं जाणून घेऊयात प्रितीच्या सह मालकीच्या संघातील नव्या हिरोसंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 01:04 IST2026-04-01T00:58:37+5:302026-04-01T01:04:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 PBKS vs GT Who Is Cooper Connolly 22-Year Old Australian All Rounder Shines On IPL Debut ForPunjab Kings vs Gujarat Titans | Cooper Connolly कोण आहे? PBKS च्या नव्या हिरोनं पदार्पणातच एकहाती लढवला किल्ला

Cooper Connolly कोण आहे? PBKS च्या नव्या हिरोनं पदार्पणातच एकहाती लढवला किल्ला

Who Is Cooper Connolly Australian All-Rounder Shines On IPL Debut For PBKS vs GT : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील गत उपविजेत्या पंजाब किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सला पराभूत करत आयपीएलच्या नव्या हंगामातील मोहिमेची सुरुवात विजयासह केली. न्यू चंदीगडमधील मुल्लानपूरच्या महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अखेरच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने ३ विकेट्स आणि पाच चेंडू राखून विजय नोंदवला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना संघ अडचणीत असताना पदार्पणाचा सामना खेळणारा युवा ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कूपर कॉलॉनी (Cooper Connolly)  संघाच्या मदतीला धावून आला.  PBKS च्या नव्या हिरोनं पदार्पणातच एकहाती किल्ला लढवत खराब रेकॉर्ड असलेल्या घरच्या मैदानात संघाला विजय मिळवून दिला. इथं जाणून घेऊयात प्रितीच्या सह मालकीच्या संघातील नव्या हिरोसंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


कोण आहेCooper Connolly?

पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीनंतर कूपर कॉनॉली एका रात्रीत स्टार झाला आहे. ऑस्ट्रेलियन  ऑलराउंडरचा जन्म पर्थमध्ये झाला. तो डावखुरा फलंदाज असून डावखुऱ्या हाताने फिरकी गोलंदाजीही करतो. २२ वर्षीय हा खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. IPL 2026 आधी पंजाब किंग्जने त्याला ३ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले आणि हा त्याचा IPL पदार्पण सामना होता.

IPL 2026 : अर्शदीप सिंगची ओव्हर संपता संपेना! लाजिरवाण्या विक्रमासह पांड्या अन् सिराजच्या पंक्तीत

अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व, अल्पावधीत छाप सोडून ऑस्ट्रेलियन संघात एन्ट्री अन्..

 २०२२ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. तसेच बिग बॅश लीग (BBL) २०२२-२३ फायनलमध्ये त्याने ब्रिस्बेन हीटविरुद्ध नाबाद २५ धावांची खेळी करत पर्थ स्कॉर्चर्सला विजेतेपद मिळवून दिले होते. ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड २०२३-२४ च्या हंगामातील फायनलमध्येही त्याने पदार्पणात ९० धावा करत आपली छाप सोडली. गतवर्षी त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले असून ऑस्ट्रेलियासाठी तो एकदिवसीय आणि टी-२० सामनेही खेळला आहे.

पदार्पणाच्या सामन्यात चमकला अन् 'प्लेयर ऑफ द मॅच' ठरला

४४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने कूपर कॉलॉनी याने ७२ धावांची नाबाद मॅच विनिंग खेळी केली. दमदार कामगिरीसाठी त्याला पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीर पुरस्कार मिळाला. सामनावीर पुरस्कार स्वीकारताना तो म्हणाला की, "ही स्पर्धा सोपी नाही.  इथं फक्त चांगला अनुभव घेण्याचा विचार करुन आलो आहे. चांगली कामगिरी करता आली याचा आनंद आहे. हा संघाचा विजय आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मी नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला याचा मला फायदा झाला."

Web Title : कूपर Connolly: PBKS के हीरो ने पदार्पण में ही जीता मैच।

Web Summary : कूपर Connolly के शानदार पदार्पण से पंजाब किंग्स ने गुजरात टाइटन्स को हराया। उनके नाबाद 72 रनों ने जीत सुनिश्चित की। Connolly के हरफनमौला कौशल ने उन्हें 'प्लेयर ऑफ द मैच' बनाया।

Web Title : Cooper Connolly: PBKS's debut hero single-handedly wins the match.

Web Summary : Cooper Connolly's stellar debut led Punjab Kings to victory against Gujarat Titans. His unbeaten 72 secured a win. Connolly's all-round skills shine, earning him 'Player of the Match'.