श्रेयसनं 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर लावला डाव! GT कडून गिलनं भारतीय अनकॅप्ड खेळाडूला दिली डेब्यू कॅप

Punjab Kings vs Gujarat Titans, 4th Match : न्यू चंदीगड येथील मुल्लानपूरच्या महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील लढतीसह पंजाब ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:44 IST2026-03-31T19:30:40+5:302026-03-31T19:44:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 PBKS vs GT Punjab Kings Wins The Toss And Opts To Bowl First Ashok Sharma Makes IPL Debut Gujarat Titans | श्रेयसनं 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर लावला डाव! GT कडून गिलनं भारतीय अनकॅप्ड खेळाडूला दिली डेब्यू कॅप

श्रेयसनं 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर लावला डाव! GT कडून गिलनं भारतीय अनकॅप्ड खेळाडूला दिली डेब्यू कॅप

Punjab Kings vs Gujarat Titans, 4th Match : न्यू चंदीगड येथील मुल्लानपूरच्या महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील लढतीसह पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सचा संघ यंदाच्या हंगामातील मोहिमेची सुरुवात करत आहे. घरच्या मैदानावर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत गिलच्या संघाला फलंदाजीस निमंत्रित केले. पंजाबचा संघ कूपर कॉनॉली, मार्को जान्सन, मार्कस स्टॉयनिस आणि झेवियर बार्टलेट हे पंजाब किंग्जचे परदेशी खेळाडू आहेत. दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाकडून अशोक शर्मा पदार्पणाची संधी मिळाली आहे. 

पंजाब किंग्स  प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल


गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, एम शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशीद खान, कागिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज.

Web Title : श्रेयस ने ऑस्ट्रेलियाई खिलाड़ियों पर दांव लगाया; गिल ने भारतीय खिलाड़ी को डेब्यू दिया।

Web Summary : श्रेयस अय्यर के नेतृत्व में पंजाब किंग्स ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया। पंजाब के लिए दो ऑस्ट्रेलियाई खिलाड़ियों ने पदार्पण किया, जबकि अशोक शर्मा ने गुजरात टाइटन्स के लिए अपने शुरुआती मैच में पदार्पण किया।

Web Title : Shreyas bets on Aussies; Gill debuts Indian uncapped player.

Web Summary : Punjab Kings, led by Shreyas Iyer, chose to bowl first. Two Australians debuted for Punjab, while Ashok Sharma debuted for Gujarat Titans in their opening match of the season.