Nuwan Thushara: आयपीएल खेळण्यासाठी नुवान तुषाराची कोर्टात धाव; नेमकं प्रकरण काय?

Nuwan Thushara News: आयपीएल २०२६ चा हंगाम रंगात आलेला असतानाच, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराने एक खळबळजनक पाऊल उचलले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:41 IST2026-04-02T16:36:29+5:302026-04-02T16:41:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Mumbai Indians Nuwan Thushara Drags Sri Lanka Cricket to Court Over NOC Dispute | Nuwan Thushara: आयपीएल खेळण्यासाठी नुवान तुषाराची कोर्टात धाव; नेमकं प्रकरण काय?

Nuwan Thushara: आयपीएल खेळण्यासाठी नुवान तुषाराची कोर्टात धाव; नेमकं प्रकरण काय?

आयपीएल २०२६ चा हंगाम रंगात आलेला असतानाच, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराने एक खळबळजनक पाऊल उचलले. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नुवान तुषाराने श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे. आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूकडे ना-हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. परंतु, श्रीलंकेच्या बोर्डाने तुषाराला प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे.

नुवान तुषाराला मुंबई इंडियन्सने त्याच्या मलिंगा स्टाईल गोलंदाजीमुळे संघात स्थान दिले. मात्र, श्रीलंकेच्या देशांतर्गत क्रिकेटमधील काही अटी किंवा राष्ट्रीय कर्तव्याचे कारण देत श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने त्याला आयपीएलसाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. बोर्डाच्या या निर्णयामुळे त्याचे आयपीएलमधील करिअर आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरोधात न्यायालयात धाव घेतली.

नुवान तुषाराची न्यायालयाकडे विनंती

नुवान तुषाराच्या वकिलांच्या मते, खेळाडूला त्याच्या करिअरच्या सर्वोत्तम काळात जगभरातील नामांकित लीगमध्ये खेळण्यापासून रोखणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. या प्रकरणावर न्यायालयाने हस्तक्षेप करून बोर्डाला एनओसी देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्ससाठी चिंतेची बाब

आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तुषारा उपलब्ध नसल्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीच्या आक्रमणावर परिणाम झाला आहे. तुषारा हा डेथ ओव्हर्समध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाज मानला जातो. जर न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल दिला, तर तो ताबडतोब भारतात येऊन मुंबईच्या संघात सामील होऊ शकतो.

Web Title : नुवान तुषारा ने आईपीएल खेलने के लिए श्रीलंका बोर्ड पर मुकदमा किया।

Web Summary : मुंबई इंडियंस के गेंदबाज नुवान तुषारा ने आईपीएल में खेलने के लिए अनापत्ति प्रमाण पत्र (एनओसी) से वंचित करने पर श्रीलंका क्रिकेट पर मुकदमा किया। उनका तर्क है कि इससे उनके अधिकारों का उल्लंघन होता है, उनके करियर और वित्त पर असर पड़ता है। मुंबई इंडियंस के लिए कोर्ट का फैसला अहम है।

Web Title : Nuwan Thushara sues Sri Lanka board for IPL participation.

Web Summary : Mumbai Indians bowler Nuwan Thushara sues Sri Lanka Cricket for denying him a No Objection Certificate (NOC) to play in the IPL. He argues this violates his rights, impacting his career and finances. The court's decision is crucial for Mumbai Indians.